राजाराम मंडल, प्रतिनिधी मधुबनी, 27 जुलै : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बीलेटा गाव मागील काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. इथे खोदकामातून चांदीचे दगड आढळल्याचा दावा केला जात होता. त्यावरूनच याठिकाणी आणखी खनिजसाठा असण्याच्या शक्यतेतून खाण विभागाने खोदकाम सुरू केलं आहे. अशातच बिहार राज्यातूनही एक विचित्र मात्र तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. बिहारमधील मधुबनीच्या चतरा गावात एक असं ठिकाण आहे, जिथे हजारो वर्षांपूर्वी राजा-महाराजांचं शासन होतं. आता जरी लोकशाहीनुसार हे गाव चालत असलं, तरी तिथल्या जमिनीतून खोदकामादरम्यान राजा-महाराजांच्या काळातील अनेक अवशेष आढळतात. या ठिकाणी असलेल्या एका राजाच्या समाधीजवळ जमिनीतून सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू आणि महाल, हवेल्यांचे अवशेष सापडतात, असा दावा लोकांनी केला आहे. मात्र या वस्तू कोणी सोबत घेऊन जाऊ शकत नाही, कारण नेलेली वस्तू पुन्हा इथेच आणून ठेवावी लागते.
गावचे पुजारी रामप्रीत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणाहून कोणी हवेल्यांचे अवशेष किंवा एखादा दगड जरी सोबत नेला तरी त्यांना स्वतःच नेलेलं सामान पुन्हा याठिकाणी घेऊन यावं लागतं. यामागचं खरं कारण काय ते माहिती नाही मात्र असं आपोआप घडतं. या समाधीजवळच एक प्राचीन मंदिरदेखील आहे जिथे मोठ्या संख्येने भाविक पूजा करण्यासाठी येतात. कदाचित या मंदिराच्या कृपेनेच असं घडत असावं, असं ते म्हणाले. एक भारतात आली, दुसरी पाकिस्तानात गेली! या 2 प्रेमवेड्या नेमक्या आहेत तरी कोण? दरम्यान, याठिकाणी नेमकी अशी कोणती शक्ती आहे की इथलं सामान कोणाजवळच टिकत नाही, असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात वर्षानुवर्षे आहे. कदाचित खोदकामातून याचं उत्तर मिळू शकेल, असं ते म्हणतात.