मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! सर्जरीनंतर डॉक्टरांकडून महिलेच्या पोटातच राहिली कात्री; 5 वर्षांनंतर घडलं भयंकर

धक्कादायक! सर्जरीनंतर डॉक्टरांकडून महिलेच्या पोटातच राहिली कात्री; 5 वर्षांनंतर घडलं भयंकर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुन्हा शस्त्रक्रिया करूनही हर्शिनाच्या वेदना कमी झाल्या नाहीत. बराच काळ झाला तरी पोटात दुखत होतं. हर्शिनाच्या या त्रासाचं कारण डॉक्टरांना समजू शकलं नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

तिरुअनंतपुरम 09 ऑक्टोबर : केरळमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे केरळमधील एका महिलेला गेली पाच वर्षे वेदनेमध्ये जगावं लागलं. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून फोरसेप (शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी धातूची कात्री) काढण्यात आली आहे. ही कात्री पाच वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पोटात राहिली होती.

हर्शिना असं या महिलेचं नाव सांगितलं जात आहे. ती मूळची केरळमधील कोझिकोडची आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये काही प्रॉब्लेममुळे हर्शिनाच्या पोटाची दोनदा शस्त्रक्रिया झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर 2017 मध्ये कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आणखी एक ऑपरेशन करण्यात आलं.

म्हणे, 'हा तर ब्रह्माचा अवतार'; विचित्र बाळाला पाहून सर्वांना बसला धक्का

पुन्हा शस्त्रक्रिया करूनही हर्शिनाच्या वेदना कमी झाल्या नाहीत. बराच काळ झाला तरी पोटात दुखत होतं. हर्शिनाच्या या त्रासाचं कारण डॉक्टरांना समजू शकलं नाही. डॉक्टरांनी तिला भरपूर अँटिबायोटिक्स दिल्या पण ही औषधंही तिच्या वेदना कमी करू शकली नाही.

आता सप्टेंबर 2022 पर्यंत वेदना असह्य झाल्यामुळे हर्शिनाने तपासणीसाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र, सीटी स्कॅनचा अहवाल आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेवर पाच वर्षांपूर्वी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच शस्त्रक्रियेदरम्यान कोझिकोडच्या वैद्यकीय डॉक्टरांनी निष्काळजीपणे कात्री पोटातच ठेवली होती. त्यामुळे महिलेच्या पोटात गंभीर संसर्ग झाला होता. हे समजल्यावर ती परत कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आली तेव्हा डॉक्टरांनी घाईघाईने महिलेची चौथी शस्त्रक्रिया करून ही कात्री बाहेर काढली. या महिलेला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव? WHOच्या दाव्याने खळबळ

आता या महिलेने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. कोझिकोड रुग्णालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोझिकोड मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ईव्ही गोपी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'आमच्याकडे शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेनं दोनवेळा खासगी रुग्णालयातही ऑपरेशन केलं होतं. सुरुवातीच्या तपासात शस्त्रक्रियेचं कोणतंही उपकरण गायब नसल्याचं समोर आले आहे'. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Operation, Shocking news