नवी दिल्ली, 01 जुलै: तसं डॉक्टरांना (Doctors) देवच मानलं जातं. पण कोरोना काळात याचा प्रत्यय अधिक आला. कित्येक डॉक्टर आपलं घरदार विसरून रुग्णसेवा करताना दिसले. आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून रुग्णांसाठी दिवसरात्र झटू लागले. जवळपास दीड वर्षे आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी ते दोन हात करत आहेत. आज डॉक्टर्स दिनानिमित्त (Doctot’s Day) तर त्यांना एक सॅल्युट बनतोच. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा (PM Narendra Modi) या डॉक्टरांसमोर नतमस्तक झाले आहेत.
Prime Minister @narendramodi wishes the nation on #NationalDoctorsDay2021
— PIB India (@PIB_India) July 1, 2021
Our doctors and medical fraternity have worked day and night to serve the nation and its 130 crore citizens. I thank all doctors and medical staff: PM @narendramodi #DoctorsDay pic.twitter.com/7lIpcmspEK
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त देशातील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी सर्वात सर्व डॉक्टरांचे आभार मानले. हे वाचा - भारताच्या दणक्याने उघडले युरोपचे डोळे, 7 देशांची Covishield ला मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला भारतातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. आज देश कोरोनासारखा मोठा लढा देत आहेत. डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत करून लाखो लोकांचं जीवन वाचवत आहेत. डॉक्टरांना ईश्वराचं दुसरं रूप म्हटलं जातं ते असंच नाही” “पुण्य कार्य करताना देशातील किती तरी डॉक्टरांनी आपलं जीवनही गमावलं आहे. मी त्यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं मोदी म्हणाले. हे वाचा - लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी रांगेत उभा राहा; मंत्र्यांना सूचना डॉक्टरांचं ज्ञान आणि अनुभव यामुळे कोरोनाव्हायरसशी लढण्यात मदत मिळते आहे. आपला देश कोरोनाविरोधी लढा जिंकणार आणि विकासाचं एक नवं ध्येय गाठणार, असा विश्वा त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना नियमांचं पालन आणि लसीकरण याबाबत अधिक सक्रिय भूमिका निभावण्याचं आवाहनही मोदींनी डॉक्टरांना केलं आहे. तसंच आरोग्य क्षेत्राचं बजेटही दुप्पट केल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.