Home /News /national /

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू; पण अख्खं गाव पोहोचलं रेबिजचं इंजेक्शन घ्यायला, काय आहे प्रकरण?

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू; पण अख्खं गाव पोहोचलं रेबिजचं इंजेक्शन घ्यायला, काय आहे प्रकरण?

रुग्णालयाबाहेरील रांग पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

    भोपाळ, 26 मार्च : ग्वाल्हेरमध्ये (Madhya Pradesh News) दह्याची कोशिबींर (रायता) खाल्ल्यानंतर 500 लोकांचं टेंन्शन वाढलं. ऐकायला कदाचित विचित्र वाटेल मात्र हे सत्य आहे. ही घटना डबरा चांदपुरा गावातील आहे. गावात एक दिवसापूर्वी सामूहिक भोजनमध्ये तब्बल 700 लोकांनी दह्याची कोशिंबीर खाल्ली. ज्या म्हशीच्या दुधापासून दही आणि त्यानंतर कोशिंबीर करण्यात आली होती, तिचा दोन दिवसांपूर्वी कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर बछड्याचाही मृत्यू झाला. यामुळे गावकरी भयभीत झाले. ते एन्टी रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. विशेष म्हणजे येथे रेबिजचं इंजेक्शन लावून घेण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. डॉक्टरांनी नकार दिला तर SDM कडे पोहोचले.. हरिसिंहने सांगितलं की, चांदपूर गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जेवणात दह्याची कोशिंबीर करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमात तब्बल 700 जणं जेवले. तोपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र तेव्हाच माहिती मिळाली की, ज्या म्हशीच्या दुधाची दही आणि कोशिंबीर करण्यात आली होती, तिचा मृत्यू झाला. हे कळताच गावकरी हैराण झाले. यानंतर 500 हून अधिक गावकरी सिव्हील रुग्णालयात एन्टी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचले. हे ही वाचा-दिवसाढवळ्या हत्येचा थरार; तरुणाने पाठलाग करत पत्नीवर केले वार,घटना कॅमेऱ्यात कैद सुरुवातील डॉक्टरांनी इतकी मोठी रांग पाहून इंजेक्शन देण्यास नकार दिला. त्यानंतर गावकरी SDM कडे पोहोचले. गावात दहशत पसरली होती. त्यावेळी डॉक्टरांनीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दूध प्यायल्याने किंवा कोशिंबीर खाल्ल्याने रेबीजसारखा आजार पसरत नाही. एसडीएम यांनी समजावल्यानंतर गावकऱ्यांची भीती कमी झाली.

    First published:

    पुढील बातम्या