मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यातून गेली 73 वर्ष मोफत प्रवास करतायंत नागरिक

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यातून गेली 73 वर्ष मोफत प्रवास करतायंत नागरिक

भारतात एक खास रेल्वे रूट आहे, जिथे प्रवास करण्यासाठी तिकीट लागत नाही. हा प्रवास अगदी फ्री असतो. काही खास लोकांनाच या स्पेशल फ्री रेल्वे रूटवर प्रवास करण्याचं भाग्य लाभतं असंही नाही. या रूटसाठी कोणतीही पात्रता किंवा शासकीय सेवे नोकरी असण्याची आवश्यकताही नाही.

पुढे वाचा ...
मुंबई, 04 मे: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत लांब रेल्वे नेटवर्क (Largest Railway Network) आहे, तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं लांब नेटवर्क आहे. आपण भारतीय रेल्वेच्या काही नेक्ससबद्दल काही बोलायचं झाल्यास देशातील रेल्वे ट्रॅकची लांबी 68 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. रेल्वे नेटवर्क देशातील विविध भाषा आणि संस्कृती असलेल्या राज्यांना एकमेकांशी जोडतं. कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, पण सर्वांनाच प्रवासासाठी तिकीट घ्यावं लागतं. लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करण्याची संधी मिळाल्याचं क्वचितच घडलं असेल. भारतात एक खास रेल्वे रूट आहे, जिथे प्रवास करण्यासाठी तिकीट लागत नाही. हा प्रवास अगदी फ्री असतो. काही खास लोकांनाच या स्पेशल फ्री रेल्वे रूटवर (Special Free Route) प्रवास करण्याचं भाग्य लाभतं असंही नाही. या रूटसाठी कोणतीही पात्रता किंवा शासकीय सेवे नोकरी असण्याची आवश्यकताही नाही. या 13 किमी लांबीच्या रूटवर कोणीही येऊन विनामूल्य प्रवास करू शकतो आणि तिकीटाच्या तपासणीसाठी इथे कोणताही TTE देखील येणार नाही. पंजाबमधील भाक्रा-नांगल हा रेल्वे रूट पूर्णपणे फ्री (Bhakra-Nangal train) आहे. या ठिकाणी विनातिकीट मोफत प्रवास करता येतो. हे वाचा-रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी भाक्रा नांगल रेल्वे रुट फ्री का आहे? भाक्रा नांगल ट्रेन Bhakra Beas Management Boardच्या माध्यमातून मॅनेज केली जाते. हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावणाऱ्या या रेल्वेचा 13 किमी लांबीचा प्रवास खूपच सुंदर आहे. ट्रेन सतलज नदीवरून जाते. या मार्गावरील प्रवाशांकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही, जेणेकरून अधिकाधिक लोकांनी भाक्रा-नांगल धरण पाहावं. 70 वर्षांपासून ही ट्रेन या मार्गावर धावत आहे. या गाडीला पूर्वी 10 डबे होते, मात्र आता फक्त 3 उरले आहेत. हे सर्व लाकडापासून तयार केलेले डबे आहेत. बीबीएमबीचे कर्मचारी याकडे हेरिटेज (Heritage) म्हणून पाहतात आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतात. हा रेल्वे मार्ग डोंगर ओलांडून धरणापर्यंत जातो. ते पाहण्यासाठी शेकडो प्रवासी येतात, मात्र विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. हे वाचा-'एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा', सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात भाक्रा-नांगल धरण बांधताना रेल्वेची बरीच मदत घेण्यात आली. धरणाचं बांधकाम 1948 मध्ये सुरू झालं होतं. तेव्हा कामगार आणि मशीन वाहून नेण्यासाठी रेल्वे ट्रॅक तयार करून त्याचा वापर केला गेला. या धरणाचं औपचारिकपणे 1963 मध्ये लोकार्पण झालं आणि हे धरण सर्वात उंच स्ट्रेट ग्रॅव्हिटी डॅम (Strait Gravity Dam) म्हणून प्रसिद्ध आहे. धरणाचं ऐतिहासिक महत्त्व असूनही या रेल्वे मार्गाचे व्यावसायिकीकरण झालेलं नाही. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुढच्या पिढीने हा वारसा पाहण्यासाठी इथे यावं, अशी बीबीएमबीची इच्छा आहे. बरमाळा, ओलिंडा, नेहला भाक्रा, हंडोला, स्वामीपूर, खेडा बाग, कलाकुंड, नांगल, सालंगडीसह आसपासच्या गावातील लोक रेल्वेने प्रवास करतात.
First published:

Tags: Indian railway

पुढील बातम्या