मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी

VIDEO - रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी

या कमी उंचीच्या नवरा-नवरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांना फक्त पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

या कमी उंचीच्या नवरा-नवरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांना फक्त पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

या कमी उंचीच्या नवरा-नवरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांना फक्त पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

पाटणा, 04 मे : जोड्या स्वर्गात बनतात असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय पाहायला मिळतो आहे तो बिहारमध्ये. जिथं कमी उंचीच्या जोडप्याचं लग्न झालं आहे. या अनोख्या जोडप्याची आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होते आहे. या लग्नसोहळ्याला बिन बुलाए मेहमानही फक्त नवदाम्पत्याची एक झलक पाहण्यासाठी येत आहेत. त्यांनी एकच गर्दी केली आहे (36 Inch groom 34 inch bride wedding).

भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया हा लग्नसोहळा पार पडला. अभिया बाजारातील किशोरी मंडल उर्फ गुजो मंडल यांची लेक 24 वर्षांची ममता कुमारी आणि मसारूतील बिंदेश्वरील मंडल यांचा 26 वर्षांचा मुलगा मुन्ना भारती दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. इतर लग्नांप्रमाणेच ममता आणि मुन्नाचं लग्न झालं. पण तरी त्यांच्या लग्नाची चर्चा होते आहे, याचं कारण म्हणजे या कपलची उंची. नवरा-नवरीच्या उंचीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे वाचा - Pushpa च्या श्रीवल्लीचेही ठुमके विसराल; Saami Saami गाण्यावर आजीबाईचा जबरदस्त Dance video

हे जोडपं बुटकं आहे. म्हणजे मुन्नाची उंची 36 इंच आहे, तर ममताची 34 इंच. या 36 इंचाचा नवरदेव आणि 34 इंचाच्या नवरीने लग्नगाठ बांधली आहे. त्यांना पाहून हे लग्न जणू काही बाहुला-बाहुलीचंच लग्न आहे, असंच वाटत होतं.

या नवदाम्पत्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. लग्नाला आमंत्रित न केलेले लोकही हजारोंच्या संख्येने आले. त्यांना फक्त मुन्ना आणि ममताची एक झलक पाहायची होती.

हे वाचा - अजब घटना! महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी अचानक शवपेटीतून येऊ लागला आवाज, अन्...

या अनोख्या जोडप्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. सोशल मीडियावरही या कपलची चर्चा होते आहे.

First published:

Tags: Bihar, Marriage, Viral, Viral videos, Wedding