नाती वाचवण्याचा प्रयत्न; माहेरच्यांनी नवीन लग्न झालेल्या मुलीशी फोनवर केवळ 5 मिनिटं बोलावं

नाती वाचवण्याचा प्रयत्न; माहेरच्यांनी नवीन लग्न झालेल्या मुलीशी फोनवर केवळ 5 मिनिटं बोलावं

मुलीच्या लग्नानंतर, मुलीच्या माहेरच्यांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशा सूचना सिंधी पंचायतीने दिल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : लग्नानंतर पती-पत्नीमधील वादही सामान्य बाब आहे. परंतु अनेकदा लग्नाच्या काही दिवसांतच पती-पत्नीमधील वाद घटस्फोटापर्यंत पोहचतो. त्याबाबत सिंधी पंचायतकडून यावर सल्ला देण्यात आला आहे. मुलीच्या लग्नानंतर, मुलीच्या माहेरच्यांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशा सूचना सिंधी पंचायतीने दिल्या आहेत. मुलीशी बोलायचं असेल, तर पाच मिनिटांत तिची विचारपूस करुन फोन ठेवावा. तसंच मुलींनी सासरच्या छोट्या-मोठ्या गोष्टी माहेरपर्यंत पोहचवू नयेत असा सल्लाही लग्न झालेल्या मुलींना देण्यात आला आहे.

सिंधी समाजात दर महिन्याला पती-पत्नीमध्ये वाद होण्याच्या 80 हून अधिक घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता सिंधी समाजाकडून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक जोडप्यांच्या लग्नाला दोन वर्षही झाली नसून त्यांच्यात सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी सिंधी पंचायतीने तपास केला असता, मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप हे वादाचं मूळ असल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक स्तरावर 28 सिंधी पंचायती आणि सेंट्रल सिंधी पंचायतमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

(वाचा - गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, युट्युब गुगलला बनवलं गुरू!)

बैरागढ येथे एका व्यक्तीने आपल्या मुलाचं लग्न, मित्राच्या मुलीशी करून दिलं. लग्नानंतर मुलीची आई रोज मुलीला फोन करायची. मुलीच्या नवऱ्याला आणि सासुला फोनवर अशाप्रकारे सतत बोलणं पसंत नव्हतं. त्यानंतर सासऱ्यांनी त्या मुलीला समजावलं पण यातून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण थेट पंचायतमध्ये पोहचलं.

पंचायतने सासऱ्यांना सुनेशी काउंन्सिलरच्या फोनवरून बोलण्यास सांगितलं. दुसरीकडे सुनेशी थेट बोलण्याऐवजी त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून बोलण्याचं सांगण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्यातील गैरसमज हळू-हळू दूर होऊ लागले आणि वादही कमी झाले.

(वाचा - मी प्रेमात तर पडले नाही ना? इथं मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर)

एका दुसऱ्या प्रकरणात, लग्नानंतर पती-पत्नीमध्ये दोन महिन्यातच भांडणं होऊ लागली. कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला. मुलाच्या वडिलांनी पंचायतमध्ये याबाबत सांगतिलं. त्यानंतर मुलीला तिच्या लहान बहिणीकडून फोनवर सासरच्या लोकांवर कसं वर्चस्व मिळवायचं हे सांगितलं जात होतं. पंचायतकडून पाच वेळा मुलीचं याबाबत काउंन्सलिंग केलं गेलं. मुलीच्या माहेरच्यांना कमीत कमी सहा महिने मुलीच्या संसारात लक्ष न देण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्या जोडप्याचं आता लग्न वाचू शकलं आहे.

(वाचा - 'मी सर्वकाही करते तो काहीच नाही; नवऱ्याचा पुरुषार्थ न दुखावता त्याला कसं सांगू?')

सेंट्रल सिंधी पंचायतमध्ये दाखल झालेल्या 95 टक्के प्रकरणांमध्ये असं समोर आलं की, माहेरच्यांच्या अधिक हस्तक्षेपामुळे नवी नवरी सासरी लवकर जुळवून घेऊ शकत नाही. मुलाकडील लोकांची एकच तक्रार येते की, मुलगी संपूर्ण वेळ तिच्या माहेरच्यांशी फोनवर बोलण्यात व्यस्त असते. कौटुंबिक वादांसह इतर काही समस्या सोडवण्यासाठी सेंट्रल सिंधी पंचायतमध्ये पाच सदस्य आहेत. सिंधी पंचायतचे अध्यक्ष भगवानदेव इसरानी यांनी सांगितलं, कौटुंबिक कलहाची प्रकरणं समाजात वाढत आहेत. आमच्या समाजात अशाप्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी 28 पंचायती काम करतात.

Published by: Karishma Bhurke
First published: February 12, 2021, 11:31 AM IST

ताज्या बातम्या