Home /News /lifestyle /

'मी सर्वकाही करते तो काहीच नाही; नवऱ्याचा पुरुषार्थ न दुखावता हे त्याला कसं पटवून देऊ'

'मी सर्वकाही करते तो काहीच नाही; नवऱ्याचा पुरुषार्थ न दुखावता हे त्याला कसं पटवून देऊ'

सेक्स करताना तुमचा जोडीदार फक्त स्वतः आनंद घेत असेल तुम्हाला आनंदी ठेवत नसेल तर काय करावं?

प्रश्न : माझा नवरा सेक्स करताना फार आळशी आणि स्वार्थी असतो. आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत, या कालावधीत मी फक्त एकदाच ओरल सेक्स केलं. पण त्याला ते दररोजच हवं असतं. साधारणपणे तो फक्त पडून राहतो आणि सर्वकाही मी करते. त्याचा पुरुषीपणा न दुखवता मी त्याला हे कसं सांगू? उत्तर : हा विषय तुमच्या पतीपर्यंत नेण्यामध्ये तुमच्या मनाची असलेली द्विधा मनस्थिती मी समजू शकते. परंतु, त्याचवेळी तुम्ही हे देखील समजून घेतलं पाहिजे की केवळ तुम्हीच तुमच्या पतीच्या लैंगिक समाधानाचा विचार करण्याची गरज नाही. जर तुम्ही लैंगिक संबंधांबद्दल खुलेपणाने संवाद साधू शकलात तर आगामी काळात तुमच्या वैवाहिक जीवनासाठी ही बाब अधिक ताकद देणारी ठरू शकेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा संवाद साधताना तुमच्या पतीचा पुरुषीपणा दुखावला जाऊ शकतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर या बाबींची अप्रत्यक्षपणे चर्चा करण्याचं अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही एकदाच ओरल सेक्स केला आहे, तर पुढच्यावेळी बेडवर त्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ शकता. त्या अनुभवाचे तुम्ही गुणगान करा, हा अनुभव किती आश्चर्यकारक होता ते पतीला सांगा, कदाचित त्यातूनच त्यांना एखादा इशारा मिळेल. हे वाचा - पहिलं किस केल्यानंतर तो माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाही, मी त्याला आवडत नाही? तसंच याबाबतचे चांगले लेख किंवा व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. बेडरुममध्ये थोडासा स्पाईस निर्माण करण्यासाठी आकर्षक परफ्युमचा वापर करा. पतीचा मूड सेट करण्यासाठी रुममध्ये मंद प्रकाश लावा आणि सुवासिक द्रव्याचा वापर करा. सेक्सविषयी लाजणं ही बाब तुम्हाला दोघांनाही मदत करू शकणारी नाही. यामुळे केवळ तुम्ही एकट्याच नाही तर दोघंही आनंदी नसताना आनंद मिळवण्याची संधी गमावू शकता. हे वाचा - 'आम्ही Open marriage स्वीकारलं आहे, पण बायको संकोच करतेय' जर एकच व्यक्ती आनंद घेत असेल तर ती बाब सेक्स नव्हे तर हस्तमैथुन करण्यासारखी असते. जर अप्रत्यक्षपणे देखील तुमचा हेतू साध्य होत नसेल तर त्याकरिता तुम्हाला प्रतिबंधक म्हणून काही उपाययोजना कराव्या लागतील अन्यथा भविष्यात तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते. परंतु तरीही मी तुम्हाला सल्ला देईन की पुढे केव्हातरी करू असं म्हणण्यापेक्षा सेक्सच्या वेळी या संवादावर भर द्या. लैंगिक संबंधावेळी तुम्ही शारिरीक भागांचा वापर करून देखील संवाद साधू शकता. जसं की तुम्ही तुमच्या पतीचे हात आणि त्याचे शरीर तुमच्या ज्या शारिरीक भागामुळे उत्तेजित होतात, त्याकडे तुम्ही पतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू शकता. यामुळे प्रत्यक्ष शब्दांपेक्षा तुम्ही तुमच्या हावभाव आणि अभिव्यक्तीव्दारे पतीशी थेट संवाद साधू शकता.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या