हैदराबाद, 02 सप्टेंबर : तामिळनाडूतील (Tamilnadu) डीएमकेचे (DMK) माजी आमदार वीरापांडी ए राजा (DMK Former MLA Veerapandi A Raja) यांचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने त्याचं निधन झालं आहे. दिवंगत वडीलांच्या फोटोला ते हार चढवायला गेले आणि तेव्हाच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
वीरापांडी ए राजा यांचा आज 59 वा वाढदिवस होता. वाढदिवशी त्यांनी आपले दिवंगत वडील आणि माजी मंत्री वीरापांडी ए अरूमुगम यांच्या फोटोसमोर आशीर्वाद घेतला. त्यांच्या फोटोला ते हार घालणार तोच त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितलं की, वडीलांच्या फोटोला हार घालताना ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हे वाचा - Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात मुंबईतील नौदलाच्या 4 जवानांचा बळी
वीरापांडी राजा हे 2006 साली विधानसभेसाठी निर्वाचित झाले होते. त्यावेळी सलेम जिल्ह्यात पक्षाच्या निवडणूक समितीचे सचिव होते. 1982 सालापासून ते द्रमुक पक्षात होते. त्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.