मराठी बातम्या /बातम्या /देश /Electronic Firecrackers in Diwali: यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक फटाक्यांची आतषबाजी, होणार नाही प्रदूषण

Electronic Firecrackers in Diwali: यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक फटाक्यांची आतषबाजी, होणार नाही प्रदूषण

Representative Image (Photo -AFP)

Representative Image (Photo -AFP)

Electronic crackers in Diwali: इलेक्ट्रॉनिक फटाके एक प्रकारचे क्विक लाईट अँड साउंड शो आहेत. हे असं डिव्हाइस आहे, जे प्रकाश आणि ध्वनी सोडतात.

  नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : प्रदूषणाची (Pollution) समस्या लक्षात घेऊन दिवाळीच्या (Diwali) काळात दिल्लीसह (Delhi) देशातील अनेक भागांत फटाके (firecrackers) उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच फटाक्यांना पर्याय बाजारात उपलब्ध होत आहे. असाच एक पर्याय म्हणजे इलेक्ट्रॉनिक फटाके (Electronic firecrackers). दिवाळीत फटाके उडवण्यावर बंदी आल्याने फटाके वाजवायचे शौकीन असलेल्यांमध्ये निराशा आहे. मात्र आता इलेक्ट्रॉनिक फटाक्यांमुळे ही निराशा काही प्रमाणात दूर झाली आहे. याशिवाय बाजारात अनेक प्रकारचे ग्रीन फटाके (Green firecrackers) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

  इलेक्ट्रॉनिक फटाके म्हणजे काय?

  इलेक्ट्रॉनिक फटाके एक प्रकारचे क्विक लाईट अँड साउंड शो आहेत. हे असं डिव्हाइस आहे, जे प्रकाश आणि ध्वनी सोडतात. याचा आवाज अगदी खऱ्या फटाक्यांसारखा येतो. हे एक स्मार्ट डिव्हाइस असून रिमोटद्वारे ते कंट्रोल केलं जाते. रिमोटद्वारे युजर्स या डिव्हाइसमधून विविध प्रकारचे आवाज येऊ शकतात. हे इलेक्ट्रॉनिक फटाके पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. त्यांचा वापर खूप सोपा आहे आणि त्यामुळे नगण्य प्रदूषण होतं. त्याचा दुसरा फायदा म्हणजे हे डिव्हाइस स्वस्त असून ते दीर्घकाळ वापरता येतं.

  वाचा : लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही?

  इलेक्ट्रॉनिक फटाके कसं काम करतात?

  या डिव्हाइसची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यामध्ये वायरने एकमेकांशी जोडलेले स्मॉल पॉड्स असतात. या पॉड्सला एलईडी बसवलेले असतात. जेव्हा तुम्ही या डिव्हाइसला वीज पुरवठा करता, तेव्हा त्यामध्ये उच्च व्होल्टेज निर्माण होतं आणि ते वेगाने स्पार्क होतं. या स्पार्कमुळे मोठा आवाज होतो, जो फटाक्यांच्या आवाजासारखा असतो. याशिवाय शोभेची दारू वापरून तयार करण्यात येणाऱ्या फटाक्यासारखा प्रकाश यामधून निघतो.

  रिमोटने बदलता येतात सेटिंग्ज

  तुम्ही रिमोटवर या डिव्हाइसची सेटिंग्ज बदलू शकता. स्पार्क करण्याची वेळ बदलता येते. हे इलेक्ट्रॉनिक फटाके शोभेच्या दारूच्या फटाक्यांशी स्पर्धा करू शकत नसले तरी दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची भासणारी कमतरता नक्कीच भरून काढू शकतात.

  वाचा : Diwali मध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्सवर देखील आकारला जातो कर, वाचा काय आहे कॅलक्यूलेशन?

  सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास घातलीय बंदी

  प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अनेक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. या बंदीमध्ये फक्त तेच फटाके समाविष्ट आहेत जे अत्यंत धोकादायक आहेत आणि ज्यामध्ये बेरियम सॉल्ट असते. यासोबतच सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, 'जर कोणत्याही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल.' तसेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना या निर्णयाबाबत स्थानिक प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि केबल सेवांद्वारे लोकांना जागरूक करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाके उडवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

  दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण बंदी

  दिल्लीत फटाके उडवण्यावर दिल्ली सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'दिल्लीत ग्रीन-फटाक्यांना मान्यता देण्याची कोणतीही चर्चा किंवा नियोजन नाही. फटाक्यावर पूर्णपणे बंदी असेल. दिल्लीतील हवेची गुणवत्ता आधीच 'खूप खराब' श्रेणीमध्ये नोंदवली जात आहे, त्यामुळे फटाक्यांवर पूर्ण बंदी आवश्यक आहे.'

  तर, 15 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांवर बंदी घातल्याची घोषणा केली होती. 'जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे' असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, 28 सप्टेंबर रोजी, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीत फटाके विक्री आणि फटाके उडवण्यावर पूर्ण बंदी घालत असल्याचे आदेश दिले.

  First published:
  top videos

   Tags: Diwali 2021, India