Home /News /money /

Diwali मध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्सवर देखील आकारला जातो कर, वाचा काय आहे कॅलक्यूलेशन?

Diwali मध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्सवर देखील आकारला जातो कर, वाचा काय आहे कॅलक्यूलेशन?

दिवाळीत बहुतेक लोक आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवस्तू देतात. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, हिरे ते कंपन्यांचे शेअर्स आणि अगदी जमीन अशा भेटवस्तूंचाही समावेश असतो. यामध्ये या विशिष्ट भेटवस्तूंवर कर भरावा लागतो.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: दिवाळीचा सण (Diwali 2021) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अजूनही दिवाळीची खरेदी अनेकजण करत आहेत. कोरोनामुळे बाजारपेठा दरवर्षीसारख्या गजबजलेल्या नसल्या तरी आपल्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट तर या सणाला दिलेच जाते. दिवाळीत बहुतेक लोक आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवस्तू देतात. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, हिरे ते कंपन्यांचे शेअर्स आणि अगदी जमीन अशा भेटवस्तूंचाही समावेश असतो. यामध्ये या विशिष्ट भेटवस्तूंवर कर (Tax on Gifts) भरावा लागतो. तर काही भेटवस्तू करमुक्त राहतात. कराच्या दृष्टीने कोणत्या भेटवस्तू कोणत्या श्रेणीत येतात हे जाणून घ्या... आयकर कायद्यानुसार (IT Act) नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू करमुक्त असतात. पण मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर आयकर भरावा लागतो. आता भेटवस्तूवरील कर कसा मोजला जातो जाणून घ्या- >> नातेवाईक आणि मित्रांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांपेक्षा कमी भेटवस्तूंवर कर भरावा लागणार नाही. >> जर गिफ्ट 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर भरावा लागेल. यामध्ये गिफ्टच्या संपूर्ण किमतीवर (Tax on Total Price)कर आकारला जातो. समजा एखाद्या भेटवस्तूची किंमत 51 हजार रुपये असेल, तर कराची गणना पूर्ण किंमतीच्या आधारे केली जाईल. >> करपात्र गिफ्ट्सना इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जाईल आणि आयकर कायद्याच्या कलम-56(2) अंतर्गत तुम्हाला कर भरावा लागेल. हे वाचा-जन धन योजनेला जबरदस्त प्रतिसाद; 7 वर्षात 44 कोटी खाती उघडली वर्षभरात एकूण मिळालेल्या गिफ्टवर लागणार टॅक्स गिफ्टच्या किंमतीच्या आधारे आकारण्यात येणारा टॅक्स केवळ एका गिफ्टवर आकारला जात नाही. तर एका आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण गिफ्ट्सच्या किंमतीवर कर आकारला जातो. अर्थात आता तुम्हाला मिळालेल्या सर्व गिफ्ट्सची किंमत 50 हजारांपेक्षा कमी असेल तर त्यावर कर आकारला जाणार नाही. मात्र असेही नाही की तुम्हाला एक गिफ्ट 51 हजारांचे मिळाले आणि दुसरे 40 हजारांचे, तर केवळ 51 हजारांच्या गिफ्टवर कर द्यावा लागेल. तर नियम असा आहे की तुम्हाला एका आर्थिक वर्षात मिळालेल्या या दोन्ही गिफ्टवर एकत्रितपणे कर द्यावा लागेल. अर्थात या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला एकूण 91 हजारांवर कर भरावा लागेल. कुणी दिलेल्या गिफ्टवर लागणार नाही कर? आयकर कायद्याच्या कलम-56 अंतर्गत नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू करमुक्त आहेत. आयकर कायद्यानुसार, पती-पत्नी,  भावंड, पती-पत्नीचे भाऊ-बहीण म्हणजेच भावजय, आई-वडिलांचे भावंडे, मामा किंवा मामा, पती-पत्नीचे भाऊ-बहीण किंवा मेव्हणे-मेव्हणी, पालकांचे बहीण-भाऊ अर्थात मामा-काका, रक्ताची नाती असणाऱ्या व्यक्ती इ. यांच्याकडून मिळणाऱ्या भेटवस्तूवर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याच वेळी मित्र हे या नातेवाईकांच्या श्रेणीत येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर आयकर आकारला जातो. हे वाचा-Gold Price Today: दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू करमुक्त आहे? लग्नाच्या वेळी मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही. पण वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसासारख्या प्रसंगी मिळालेल्या भेटवस्तू आयकरअंतर्गत येतात. याशिवाय वारसाहक्काने मिळालेल्या भेटवस्तू, मृत्युपत्रात मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या