नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: दिवाळी (Diwali 2021) म्हणजे दिव्यांचा सण. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन (Laxmi puja date time muhurat) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन (Laxmipujan muhurat) 4 नोव्हेंबरला (गुरुवार) आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे.
संपूर्ण देशभरात या दिवशी लक्ष्मीचं पूजन होतं. सोबत गणपती, संपत्तीची देवता कुबेर, कालिकामाता आणि देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसह विष्णूची (Vishnu) पूजा केली जात नाही. या सर्व देवीदेवतांच्या पूजेदरम्यान या दिवशी भगवान विष्णूंची पूजा का केली जात नाही यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी भगवान विष्णूंविनाच लक्ष्मीची एकटीची पूजा का केली जाते यामागची ही आहेत कारणं.
Diwali 2021 : दिवाळीच्या रात्री हे प्राणी-पक्षी दिसणं म्हणजे घरात लक्ष्मीच्या आगमनाचे आहेत संकेत
देवदिवाळीला भगवान विष्णूंचं आगमन
दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णू त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू चातुर्मासाच्या संपूर्ण काळात योगनिद्रेत असतात आणि ते दिवाळीनंतरच्या एकादशीला जागे होतात असं मानलं जातं. दिवाळी चातुर्मासात येत असल्यानं त्यांची निद्रा मोडू नये यासाठी लक्ष्मीपूजनाला त्यांना आवाहन केलं जात नाही किंवा त्यांची पूजाही केली जात नाही.
Tips : या सोप्या पद्धतीने ओळखा खवा असली आहे की नकली, होणार नाही तुमची फसवणूक
कार्तिक पौर्णिमेला जेव्हा भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात त्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी अनेक मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली जाते आणि धार्मिक कार्यक्रमही होतात.
वजन नियंत्रणात ठेवायचं आहे ना? मग नाष्ट्यात कधीही या गोष्टी खाऊ नका
दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानेच या सणाला अनेक जण आपल्या मूळ गावी किंवा मूळ घरी जातात. नवे कपडे घालतात. फटाके उडवतात. किल्ला करतात. पती-पत्नीचा दिवाळी पाडवा साजरा होतो. भाऊ-बहिणीची भाऊबीज साजरी केली जाते. या सगळ्यांतून नाती दृढ होते आणि माणुसकीही दृढ होते. म्हणूनच दिवाळी ही केवळी पूजेची नाही तर ती भेटीगाठींचीही लयलूट करणारी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Culture and tradition, Diwali 2021, Diwali-celebrations