मोठा झटका! 20 वर्षांत पहिल्यांदाच करवसुलीत होऊ शकते घट

मोठा झटका! 20 वर्षांत पहिल्यांदाच करवसुलीत होऊ शकते घट

आर्थिक मंदी आणि मागच्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेल्या कपातीनंतर थेट करवसुलीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर गेल्या 20 वर्षांतली ही सर्वात कमी करवसुली असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : आर्थिक मंदी (Economic Slowdown) आणि मागच्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये (Corporate Tax) केलेल्या कपातीनंतर थेट करवसुलीमध्ये (Direct Tax Collection) घट होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर गेल्या 20 वर्षांतली ही सर्वात कमी करवसुली असेल. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत याबद्दल माहिती दिली आहे. या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट आणि इनकम टॅक्सची वसुली कमी होईल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. प्रत्यक्ष करवसुली 13. 5 लाख कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा अंदाज 17 टक्के जास्त आहे. असं असलं तरी मागच्या वर्षीचं मागणी आणि पुरवठ्यात आलेली घट पाहता कंपन्यांच्या कारभारावर परिणाम झाला आहे.

आतापर्यंत किती झाली वसुली?

23 जानेवारीपर्यंत आलेल्या माहितीनुसार, टॅक्स डिपार्टमेंट (Department of Tax)ने आतापर्यंत 7.3 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वसुली 5.5 टक्क्यांनी कमी आहे.

कर विभागात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, करवसुलीचं उद्दिष्ट तर दूरच राहिलं पण टॅक्समध्ये एवढी घट याचवर्षी पाहायला मिळतेय. या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करवसुली मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 टक्के कमी राहील.

(हेही वाचा : BI ने ग्राहकांना दिला अलर्ट, या चुका करू नका नाहीतर रिकामं होईल बँक खातं)

का झाली इतकी घट?

सरकारच्या वार्षिक महसुलात थेट कराचा वाटा 80 टक्के असतो. यातच काही घट झाली तर सरकारला खर्च पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळेच यावर्षी मागच्या वर्षीएवढा कर वसूल झाला तरी मोठी गोष्ट असेल, असं एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. मोदी सरकारला या अर्थसंकल्पात आर्थिक मंदीवर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यातच करवसुलीत घट होण्याचा अंदाज ही आणखी एक चिंतेची बाब आहे.

=============================================================================================

First published: January 24, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या