नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. SBI सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना बँक गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी माहिती देतंय. SBI ने ट्वीट करून पुन्हा एकदा ग्राहकांना इशारा दिला आहे. वाढत्या गैरव्यवहारांपासून ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे, असं यामध्ये म्हटलंय. ATM कार्डाचे डिटेल्स आणि PIN च्या माध्यमातून पैसे चोरण्याचे प्रकार वाढत चाललेत. त्यामुळे SBI ने आपल्या ग्राहकांना ATM कार्ड आणि PIN सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. SBI ने या गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी काय उपाय केले आहेत ते बघुया. बँक खात्याबद्दलची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका स्टेट बँक ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की, आपलं बँक खातं किंवा ऑनलाइन बँकिंगची माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नये. बँक अकाउंट नंबर,पासवर्ड, ATM कार्डचा नंबर किंवा त्याचा फोटो फोनमध्ये ठेवलात तर ही माहिती लीक होण्याचा धोका आहे.
Your ATM CARD & PIN are important. Here are some tips to keep your money - safe & secured. For information, please visit -https://t.co/dqeuQ4j0JI pic.twitter.com/NUaFB6jOmg
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 22, 2020
ATM कार्डाचे डिटेल्स शेअर करू नका आपल्या ATM चा उपयोग स्वत:च केला पाहिजे. ते कार्ड दुसऱ्या व्यक्तीकडे देऊ नये. असं केलं तर तुमच्या खात्यातली माहिती लीक होऊ शकते. तुमच्या परवानगीशिवाय हे व्यवहारही होऊ शकतात. पिन शेअर करू नका कुणालाही OTP (वन टाइम पासवर्ड), पिन नंबर, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा CVV नंबर देऊ नका. बँकेच्या माहितीनुसार, बरेच गैरव्यवहार असेच केले जातात. फोन कॉलवर बँकेचं नाव घेऊन तुमचं कार्ड ब्लॉक करण्याचा इशारा दिला जातो आणि पासवर्ड बदलण्यासाठी OTP किंवा CVV नंबर मागितला जातो. या फसवणुकीपासून सावध राहा, असंही बँकेने सांगितलं आहे. SBI ने म्हटलं आहे की, ग्राहकांकडे बँक कधीही युजर आयडी, पिन, पासवर्ड, CVV, OTP अशी माहिती मागत नाही. त्यामुळे ही माहिती कुणाशीही शेअर करू नका. ==================================================================================================