नवी दिल्ली, 21 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus)संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. दिवसागणिक 35-40 हजार नवीन रुग्ण सापडताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले.याआधी सोमवारी तब्बल 40 हजार नवीन रुग्ण सापडले होते, त्यामुळे रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे दिसत आहे. तर, 24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, सध्या देशात 4 लाख 2 हजार 529 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 28 हजार 084 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे 7 लाख 24 हजार 577 रुग्ण निरोगीही झाले आहेत.
Spike of 37,148 cases and 587 deaths reported in India in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 21, 2020
Total #COVID19 positive cases stand at 11,55,191 including 4,02,529 active cases, 7,24,578 cured/discharged/migrated and 28084 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/iuKN63EYtV
देशातील एकूण रुग्णांपेक्षा 1.23 लाख रुग्ण एकट्या दिल्लीत आहे. दिल्ली सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये तिसऱ्या तर मृतांच्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत. देशात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 3.18 लाख आहे.
इतर राज्यांची आकडेवारी
महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक
कोरोनाचे सर्वात जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सोमवारी राज्यात कोरोनाचे 8240 नवे रुग्ण सापडले. तर, 176 जणांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 695 झाली आहे. तर, 1 लाख 75 हजार 029 रुग्ण निरोगी झाले आहेत. मुंबईत एकाच दिवसात 1043 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णंची संख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india