पुणे, 20 जुलै : पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्णालयात गर्दी वाढल्याने आता आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागली आहे. त्यातच पुण्यातील रुग्णालयांमध्ये एकही व्हेटिंलेटर उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याच व्हेंटिलेटरअभावी पुण्यात एक-दोन नव्हे तर चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे आपण प्रगतीच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहोत, पण कोरोना व्हायरस नावाच्या संकटाने आपल्या आरोग्य व्यवस्थेचा दुबळेपणा उघड केला आहे. शासन आणि प्रशासन या व्यवस्थेला खडबळून जागं करणारी आकडेवारी पुण्यातून समोर आली आहे. पुण्यात व्हेंटिलेटर नसल्यानं मृत्यू 14 जुलैला शास्त्रज्ञाने सोडले प्राण पुणे शहरात 14 जुलै रोजी निवृत्त शास्त्रज्ञाला श्वसनाचा त्रास सुरू झाला. मात्र एकाही खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. ससूनमध्ये ऑक्सिजन लावला पण व्हेंटिलेटर नाही. अशा स्थितीमुळे दुसऱ्या दिवशी पहाटे रुग्णाचा मृत्यू झाला. 7 जुलैला एका कुटुंबाचा आधार हिरावला हिंगणेमधील 44 वर्षीय पुरुषाचा 7 जुलैला मृत्यू झाल्याची घटना घडली. इथेही कारण होतं व्हेंटिलेटरच्या कमतरतेचं. 4 खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर मिळाला नाही. त्यानंतर ससून रुग्णालयात सदर रुग्णाचा मृत्यू झाला. वडगावशेरीतील वृद्धाचं निधन वडगावशेरीतील 69 वर्षांचा मधुमेहग्रस्त रुग्ण 5 जुलै रोजी मृत्यूशी झुंजत होता. मात्र त्याला 2 खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अखेर ससून रुग्णालयात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आंबीलमधील रुग्णाच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरला व्हेंटिलेटर आंबील ओढ्यातील रुग्ण खासगी रुग्णालयात रोजी भरती झाला. पण व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. त्यानंतर या रुग्णाला 4 खासगी रुग्णालयांमध्ये नेलं गेलं. पण व्हेंटिलेटर मिळालाच नाही. 23 जूनला अखेर काही तासांतच या रुग्णाने जीव सोडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.