नवी दिल्ली , 10 फेब्रुवारी : नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA च्या विरोधातील आंदोलनं सुरूचं आहेत. जामिया समन्वय समितीने जामिया ते संसद असा निषेध मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेल्या शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ काही बॅनरही दाखवण्यात आले. शरजील इमाम यांची मीडिया ट्रायल व्हायला नको अशी मागणी यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर शरजीलवर आरोप सिद्ध झाले तरच त्याच्यावर कारवाई व्हावी अशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अगोदरही जामिया सनन्वय समितीने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.. नागरिकत्व सुधारणा कायदा, NRC आणि NPR लागू करण्याला जामिया समन्वय समितीचा तीव्र विरोध आहे. त्यांच्या वतीनेच हा मोर्चा काढण्यात आला होता.
शरजील इमामविरोधी माध्यमांमधून नकारात्मक मजकूर प्रसिद्ध होत आहे. माध्यमांनी त्याला देशद्रोही ठरवून टाकलं आहे. अशा प्रकारे माध्यमांनीच न्याय न देता, त्याच्यावरचा गुन्हा प्रत्यक्षात सिद्ध झाल्यावरच त्याविषयी लिहावं.
हे वाचा - 'पाकला धडा शिकवेन', शहीद वडिलांना अग्नी देताना 10 वर्षाच्या मुलाचा हुंकार
मीडिया ट्रायल होऊ देऊ नये अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांनी CCA च्या विरोधात जामिया ते संसद निषेध मोर्चा काढला. त्या वेळी शरजीलच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.
कोण आहे शरजील इमाम?
शरजील इमाम हा जेएनयूचा विद्यार्थी आहे.त्याच्यावर देशद्रौहाचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा - 'प्रेम की गंगा बहाते चलो', मुस्लीम मुलीच्या लग्नाचं हिंदू कुटुंबाने दिलं आमंत्रण
काही दिवसांपूर्वी बिहारच्या जहानाबाद इथून त्याला अटक करण्यात आलीय.. दिल्ली पोलिसांनी इमामवर भारतीय दंड संहिता 124 ए, 153 ए, 505 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 26 जानेवारीला देशविरोधी भाषण करतानाचा शरजीलचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत शरजील सरळसरळ देशविरोधी वक्तव्य करताना दिसून येतोय. या भाषणात इमाम उत्तर-पूर्व भारताला वेगळा करण्याची भाषा करतोय.तर दिल्लीच्या शाहिन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळात शरजील हा आयोजकांपैकी एक होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: JNU