Home /News /national /

'पाकला धडा शिकवेन', काश्मीरमध्ये शहीद झालेल्या वडिलांना अग्नी देताना 10 वर्षाच्या मुलाचा हुंकार

'पाकला धडा शिकवेन', काश्मीरमध्ये शहीद झालेल्या वडिलांना अग्नी देताना 10 वर्षाच्या मुलाचा हुंकार

पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात लुहाकना खुर्द इथले राजीव सिंग शहीद झाले.

    जयपूर, 10 फेब्रुवारी : काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं होतं. यामध्ये राजीव सिंग यांना वीरमरण आलं होतं. शहीद राजीव सिंग यांच्यावर शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतून प्रागपुरा पोलिस ठाण्यात शहीद राजीव सिंग यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या लुहाकना इथल्या घरी त्यांचे पार्थिव नेण्यात आलं. इथंपर्यंत 15 किमी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शहीद राजीव यांच्या पार्थिवाला 10 वर्षीय मुलगा आदिराज याने मुखाग्नी दिला. यावेळी आदिराजने आपणही बाबांसारखं भारतीय लष्करात भरती होणार आणि पाकिस्तानला धडा शिकवणार असं म्हटलं. राजीव सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी जयपूर ग्रामिणचे खासदार राज्यवर्धन सिंग राठोडसुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशिवाय मंत्री, आमदारही अंत्ययात्रेत सामिल झाले होते. वडिलांना वीर मरण आल्यानंतर त्यांच्या मुलगा आदिराज म्हणाला की, माझे आजोबासुद्धा लष्करात नायब सुभेदार होते. वडिलांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचा आम्हाला गर्व आहे. वडील देशाचे कामी आले. पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात लुहाकना खुर्द इथले राजीव सिंग शहीद झाले. रविवारी ते शहीद झाल्याची बातमी त्यांच्या गावी समजताच गावावर शोककळा पसरली. निषेधासाठी रस्ता रोखू शकत नाही, शाहीन बाग आंदोलनकर्त्यांवर SC कठोर भूमिका राजीव सिंग 2002 मध्ये लष्करात भरती झाले होते. सध्या ते लष्करातील 5 राजपूत ग्रुपमध्ये नायक पदावर कार्यरत होते. डिसेंबर महिन्यात राजीव सुट्टीसाठी गावी आले होते. त्यानंतर 8 जानेवारीला ते पुन्हा रुजू झाले होते. त्यांच्या निवृत्तीला एकच वर्ष उरले होते. झवेरी बाझारात घडवला होता बॉम्बस्फोट, 27 वर्षांनंतर दहशतवादी मुसाला मुंबईतून अटक
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या