• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Delhi Air Pollution: राजधानीत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांची एंट्री BAN! केवळ CNG-इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी

Delhi Air Pollution: राजधानीत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांची एंट्री BAN! केवळ CNG-इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी

देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता (Delhi Air Quality) सुधारली आहे. पण तरीही अद्याप याठिकाणची हवा खराब श्रेणीत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय (Gopal Rai) यांनी घोषणा केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता (Delhi Air Quality) सुधारली आहे. पण तरीही अद्याप याठिकाणची हवा खराब श्रेणीत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय (Gopal Rai) यांनी घोषणा केली आहे की, '27 नोव्हेंबरपासून अत्यावश्यक सेवेसाठी चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी (CNG) वाहनांनाच शहरात प्रवेश मिळेल. या व्यतिरिक्त 3 डिसेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या (Petrol and Diesel Vehicles Entry Ban) प्रवेशावर बंदी असेल.' दुसरीकडे प्रदूषणात (pollution in Delhi) झालेली घट पाहून दिल्ली मंत्रिमंडळाने आता 29 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाल राय पुढे म्हणाले, 'दिल्ली सरकारचे जास्तीत जास्त कर्मचारी ज्या ठिकाणांहून येतात, त्या मार्गावर कर्मचाऱ्यांसाठी बसेस चालवल्या जातील. सरकार आपल्या कर्मचार्‍यांसाठी दिल्ली सचिवालय ते आयटीओ आणि इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनपर्यंत शटल बस सेवा सुरू करील. गेल्या तीन दिवसांत हवेची गुणवत्ता सुधारली आहे. शहराचा एक्यूआय दिवाळीपूर्वीच्या दिवसांसारखाच आहे.' हे वाचा-याला म्हणतात ईमानदारी, पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी 90 किमी प्रवास दिल्लीतल्या प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे यापूर्वी नवीन वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. याशिवाय, 13 नोव्हेंबर रोजी दिल्ली सरकारने शहरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. नवीन बांधकाम करणं आणि बांधकाम पाडणं, अशा कामांवर बंदी घालण्याचे आदेश दिले. कर्मचार्‍यांना वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि त्याचे आरोग्यावरचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी घरून काम करण्यास सांगितलं गेलं होतं. 17 नोव्हेंबर रोजी दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक न करणाऱ्या ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्याबरोबरच निर्बंध वाढवण्यात आले होते. हवेच्या गुणवत्तेत झालेली सुधारणा आणि कामगारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सोमवारी (22 नोव्हेंबर) बांधकाम आणि पाडकामावरची बंदी उठवण्यात आली होती; मात्र दिल्ली आणि एनसीआरमधली वायू प्रदूषणाची समस्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा बांधकाम कामांवर बंदी घातली. न्यायालयाने इलेक्ट्रिकल, कारपेंट्री, इंटीरियर वर्क आणि प्लंबिंगच्या कामांना मात्र सूट दिली आहे. वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर आधीच बंदी घातली आहे. याशिवाय वैध पीयूसी (PUC) प्रमाणपत्र अनिवार्य आहे. आता वैध पीयूसीशिवाय वाहन चालवणाऱ्यांना 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसंच वाहनाची पीयूसी न केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतं. हे वाचा-विषारी वायू पसरल्यानं दहशत, काही लोकांच्या डोळ्यात जळजळ तर डझनभर लोक बेशुद्ध मनीष सिसोदिया यांनी केलं होतं आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी छोटे छोटे उपाय करण्याचं आवाहन यापूर्वी केलं होतं. त्यांनी दिल्लीकरांना त्यांच्या खासगी वाहनांऐवजी बस किंवा मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक महिन्यातून एकदा तरी वापरण्याची विनंती केली होती. सिसोदिया म्हणाले होते, की 'दिल्लीतल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला जबाबदारी घ्यावी लागेल.'
First published: