भारतीय बनावटीच्या COVAXIN लशीला मोठा धक्का; अमेरिकेनं आपत्कालीन वापरास दिला नकार

भारतीय बनावटीच्या COVAXIN लशीला मोठा धक्का; अमेरिकेनं आपत्कालीन वापरास दिला नकार

भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सिन लशीच्या (Covaxin Vaccine) आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएने नकार (Denies emergency use) दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून: भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) अशा दोन लशीचं उत्पादन घेतलं जात आहे. यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII) याठिकाणी उत्पादन होतं असलेल्या कोविशिल्ड लशील जगभर मोठी मागणी आहे. पण हैदराबाद याठिकाणी भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून उत्पादित केली जाणाऱ्या कोव्हॅक्सिन लशीच्या (Covaxin Vaccine) आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेनं नकार (Denies emergency use) दिला आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) देण्यात आला होता. मात्र FDA ने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे.

कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी मिळवण्यासाठी भारत बायोटेकची अमेरिकतील सहकारी कंपनी ओक्यूजेन आयएनसी बायोलॉजिक्स लायसन्सकडे अर्ज करणार आहे. ओक्यूजेन आयएनसी ही भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या मिळून हैदराबाद याठिकाणी लशीचं उत्पादन घेतं आहेत. दरम्यान भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूजेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. मात्र ‘एफडीए’ने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली नाही.

'एफडीए' कोव्हॅक्सिन लशीचं आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितलं आहे. यानंतरच अमेरिकेत पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युजेनकडून सांगण्यात आलं आहे. आपत्कालीन वापराच्या परवानगीला नकार देताना अमेरिकेच्या एफडीने एक वेगळा मार्ग सुचवला आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी ऑक्युजेन एफडीएच्या सल्ल्यानुसार बीएलएकडे अर्ज दाखल करणार आहे. या संस्थेकडून लशीच्या वापराला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे पुढील आणखी काही काळ भारत बायोटेकला मंजुरीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा-देशातील शास्त्रज्ञानं बनवलं पॉकेट व्हेंटिलेटर, कोरोना लढ्यात ठरणार महत्त्वपूर्ण

अलीकडेचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आरोग्य विभागाचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची यांनी कोव्हँक्सिन लस प्रभावी असल्याचं म्हटलं होतं. पण अमेरिकेच्या एफडीएने मंजूरी नाकारल्याने कॉव्हॅक्सिनच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याचा परिणाम इतर देशातही होऊ शकतो.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 4:50 PM IST

ताज्या बातम्या