नबीला सादिक अनेक दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत होत्या. जामियामध्ये एमए करणारे लारेब नियाजी यांनी आज तकशी बोलताना सांगितलं की, डॉ. नबीलाची प्रकृती खराब झाल्याचं समजताच काही मित्रमैत्रिणींसह आम्ही त्यांच्या घरी गेलो होते. त्यांना जामियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना तिथून फरीदाबादच्या फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं. हे वाचा - कोरोना संसर्ग झाल्याच्या भीतीनं प्यायला रॉकेल; चाचणीत झाला वेगळाच खुलासा 2 मे नबीला यांनी खळबळजनक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी कुणीच जिवंत राहू शकणार नाही, असं म्हटलं होतं. कोरोनाची सद्यस्थिती पाहता त्यांनी हे ट्वीट केलं होतं. 'अशा परिस्थितीत किमान दिल्लीत तरी कुणीच जिवंत राहू शकणार नाही', अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर केली होती. 4 मे रोजी त्यांनी पुन्हा ट्वीट केलं होतं आणि आपल्यासाठी आयसीयू बेडही मागितला होता. हे वाचा - भारतात फक्त 2 टक्के लोकांनाच कोरोनाची बाधा, पण... दरम्यान नबीला यांच्या आई आणि आणि वडिलांनाही कोरोना झाला होता. त्यांचे वडील कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या आईवरही दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नबीला यांनाही सांगितलं नव्हतं. कारण तिची प्रकृती गंभीर होती, असं नियाजी यांनी सांगितंल.At this rate no one will stay alive in Delhi atleast.
— Mermaid (@SugarsNSpice) May 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Delhi, Woman doctor