मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भारतात फक्त 2 टक्के लोकांनाच कोरोनाची बाधा, पण...

भारतात फक्त 2 टक्के लोकांनाच कोरोनाची बाधा, पण...

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं (COVID-19 in India) भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ 2 टक्के लोक बाधित झाले आहेत. अद्याप 98 टक्के लोकसंख्या कोरोनापासून दूर असली तरी त्यांना अद्यापही कोरोनाचा धोका आहे.

नवी दिल्ली, 19 मे: देशात आता कोरोना विषाणूमुळं बाधित होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र, मृतांची संख्या अद्यापही भीतीदायक आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) मंगळवारी आकडेवारी जाहीर केली आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं (COVID-19 in India) भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ 2 टक्के लोक बाधित झाले आहेत. अद्याप 98 टक्के लोकसंख्या कोरोनापासून दूर असली तरी त्यांना अद्यापही कोरोनाचा धोका आहे.

मंगळवारी याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयानं म्हटले आहे की, इतर देशांमध्ये कोरोनाबाधित लोकसंख्येचा आकडा बराच मोठा आहे. परंतु, आपल्याकडे तो कमी ठेवण्यात भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाशी आपण चांगला लढा देत आहोत. या महामारीला सामोरे जाण्यासाठी देशात विविध उपाय योजले गेले त्यामुळे मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून बचावली.

कोरोना संसर्गाची मोठ्या प्रमाणात संख्या असूनही देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंत संसर्ग मर्यादित ठेवता आला. यासाठी देशातील डॉक्टर, नर्स त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेेल्या श्रमाशिवाय हे शक्य नव्हते, असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

हे वाचा - कौतुकास्पद! ‘हा’ मराठी अभिनेता लग्न रद्द करून, होणाऱ्या पत्नीसोबत करतोय रुग्णसेवा

मात्र, काही लोकांनी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने राष्ट्रीय सेरो सर्व्हेच्या निकालाकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की देशातील सुमारे 20 टक्के लोक कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ इंडियानं (ICMR) केलेल्या सर्वेक्षणानुसार असे म्हटले गेले होते की, देशातील 21.4 टक्के तरुणांना गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हे वाचा - देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

दरम्यान, देशात एकाच दिवशी कोविड-19 च्या संसर्गामुळं आणखीन 4,529 रुग्णांचा मृत्यू झाला. या नवीन मृतांच्या संख्येसह देशात आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या वाढून ती 2,83,248 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या हेल्श बुलेटीननुसार एका दिवसात कोविड-19 चे 2,67,334 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 2,54,96,330 इतकी झाली आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Covid-19