नवी दिल्ली, 19 मार्च : निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश मनमोहन आणि न्यायाधीश संजीव नरूला यांनी याला ठोस आधार नसल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाचा वेळ वाया घालवत असल्याचं म्हणत दोषींचे वकील एपी सिंगना फटकारलं. याचिकेत कोणतीही कागदपत्रे पूर्ण नाही. अॅनेक्सचर नाही, अॅफिडेव्हिट आणि कोणत्याच पक्षाचा मेमोसुद्धा नाही. न्यायालयाने कठोर शब्दात यावर सुनावणी करताना म्हटलं की, यात काहीही उरलेलं नाही. तुम्हाला ही याचिका दाखल कऱण्याची परवानगी आहे. यावर दोषींच्या वकिलांनी कागदपत्रांची पूर्तता करता आली नसल्याचं कारण पुढे केलं. यावर हद्द करत म्हटलं की, कोरोनामुळे झेरॉक्स दुकानं बदं आहेत. त्यामुळं कागदपत्र सादर कऱण्यासाठी पुरेसा वेळ दिला जावा. न्यायालयाने यामध्ये काहीच ठोस नसल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता शुक्रवारी पहाटे दोषींना फाशी होण्यावर शिक्कामोर्तब झालं. न्यायाधीशांनी दोषींच्या वकिलांना सांगितलं की, तुमच्या क्लायंटना एकच काम करावं लागेल. आता त्यांची देवाला भेटण्याची वेळ आली आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना उद्या (20 मार्च) फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पतियाळा कोर्टाने दोषींच्या सर्व याचिका फेटाळत फाशीला स्थगिती देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही दोषींचे वकिलाचा शेवटच्या क्षणापर्यंत फाशी टाळण्याचा खटाटोप सुरू आहे. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी वारंवार याचिका करून तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे सगळे मनसुबे अपयशी ठरले आहेत. फाशीला स्थगिती मिळवण्यासाठी दोषींच्या वकिलाने कुठलेही युक्तिवाद केले. ‘त्यांना फाशी द्यायच्या ऐवजी जन्मठेप द्या. त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा किंवा डोकलामला पाठवा. ते देशाची सेवा करायला तयार आहेत. मी तसं लिहून देतो’, असं दोषींचे वकील ए. पी. सिंग कोर्टापुढे म्हणाले. फाशी देऊन बलात्काराच्या घटना थांबणार आहेत का, असाही युक्तिवाद सिंग यांनी केला. पण कोर्टाने त्यांचे सगळे युक्तिवाद फेटाळून लावत फाशीच्या तारखेवर शिक्कमोर्तब केलं.
Nirbhaya case: Delhi HC says SC judgement confirming death sentence to four convicts has attained finality; cannot sit to review it
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
आपल्या देशाच्या घटनेनुसार आणि कायद्यानुसार दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि असामान्य गुन्ह्यासाठीच केवळ मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. फाशी देण्यासाठी बरेच नियम आणि प्रथा पाळल्या जातात. फाशीची तयारी कारागृह प्रशासन बराच काळ आधीपासून करत असते. मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांना मृत्यूच्या वेळी कमीत कमी शारीरिक वेदना व्हाव्यात यासाठीही तयारी केली जाते. अशा अनेक प्रथांपैकीच एक म्हणजे फाशीची वेळ शक्यतो अंधारातली असते. सूर्योदयापूर्वी फाशी देण्याची पद्धत आहे. तसा नियम आहे. फाशीची तारीख 20 मार्च ठरल्यानंतर सकाळी 6 वाजता फाशी दिली जाईल, असं जाहीर करण्यात आलं. पण लगेचच ही वेळ बदलल्याची बातमी आली. 6 ऐवजी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीला त्या दिवशीच्या सूर्योदयाची वेळ पाहता फाशीच्या अंमलबजावणीची वेळही बदलण्यात आली असावी, अशी चर्चा आहे. हे वाचा : Nirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर… काय आहे नियम? आतापर्यंत नेमकं काय झालं? संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील (Nirbhaya Gang Rape Case) दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं. हे वाचा : वकिलाचा फाशी वाचवण्याचा खटाटोप; म्हणे त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा