लॉकडाऊनमध्ये धारदार शस्त्रानं वार, पाहा तरुणाच्या हत्येचा थरारक VIDEO

लॉकडाऊनमध्ये धारदार शस्त्रानं वार, पाहा तरुणाच्या हत्येचा थरारक VIDEO

दोन युवकांनी एका तरुणाचं अपहरण केलं त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी मिळून या तरुणाला बेदम मारहाण केली त्यानंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 19 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज आहे. अनेक ठिकाणी माणुसकी दाखवणाऱ्या घटना समोर येत असतानाच दिल्लीत मात्र माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोलीस प्रशासन सज्ज असतानाही बंदुकीचा धाक दाखवून बाईक वरून येणाऱ्या दोन युवकांनी एका तरुणाचं अपहरण केलं त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी मिळून या तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

या तरुणाचं अपहरण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांना या तरुणाचा शोध घेतल्यावर दिल्लीतील जीटी रोड जवळील पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये जखमी अवस्थेत तरुण सापडाल. पोलिसांनी या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र मंगळवारी सकाळी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हे वाचा-दहशतवाद्यांनाही कोरोना, पाकने उपचारास नकार दिल्याने अतिरेकी भारतात करणार प्रवेश?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला वाईट पद्धतीनं मारहाण करण्यात आली होती. या तरुणाचे हात तुटले होते आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजित हा परिवारासह परिपत्रक रोड, जनता कॉलनी, विवेक विहार येथे राहत होता. सुरजीतचे दोन भाऊही काही अंतरावर राहात आहेत. सुरजितला पिस्तुलाचा धाक दाखवून बाईकवर बसवण्यात आलं त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हे वाचा-वांद्रे गर्दी प्रकरणावरुन शरद पवारांनी टोचले भाजपचे कान, म्हणाले...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 15, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या