Home /News /national /

धक्कादायक प्रकार! एकाच वडिलांवर लेकानं दोनवेळा केले अंत्यसंस्कार, असा झाला गोंधळ

धक्कादायक प्रकार! एकाच वडिलांवर लेकानं दोनवेळा केले अंत्यसंस्कार, असा झाला गोंधळ

मृतदेहाच्या अदली बदलीमुळं एका मुलाला वडिलांना 2 वेळा दफन करावे लागले.

    नवी दिल्ली, 08 जून : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही वाढत आहे. यातच नवी दिल्लीतील खाजगी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलच्या मौलाना आझाद मोर्चारीमध्ये 2 कोरोना रूग्णांचा मृतदेह बदलल्यामुळं गोंधळ झाला. मोईनुद्दीन व मइनुद्दीन असे मृतांचे नाव असल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला. यामुळं एका मुलाला आपल्या वडिलांना 2 वेळा दफन करावे लागले. मृतदेहाच्या अदली बदलीमुळं एका मुलाला वडिलांना 2 वेळा दफन करावे लागले, तर दुसऱ्या मोइनुद्दीने संपूर्ण कुटुंब रविवारी मौलाना आझाद मोर्चरीमध्ये मृतदेहाचा शोध घेत होते. दरम्यान आता दोन्ही मृतदेह एकमेकांच्या शेजारी दफन करण्यात आले आहेत. वाचा-काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS कोरोना पॉझिटिव्ह निघाले मोइनुद्दीन दोघांपैकी एक जुन्या दिल्लीतील मोइनुद्दीन ज्यांचे वय 50 वर्ष होते, त्यांना 4 जून रोजी उच्च रक्तताबामुळं LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत मृतदेह रुग्णालयातील मोर्चरीमध्ये ठेवण्यात आला. सायंकाळी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 7 जून रोजी त्यांचे शव घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहचले. त्यावेळी त्यांना दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह देण्यात आला. त्यानंतर कळलं की 6 जून रोजी आणखी एक मइनुद्दीन नावाच्या व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. दोघांचे नाव एकसारखे असल्यामुळं हा गोंधळ झाला. मोइनुद्दीनच्या घरच्यांनी दुसऱ्याचा दफन केला, त्यानंतर त्यांना या गोंधळाबाबत कळवण्यात आले. रुग्णालय प्रशासनानं नंतर मोइनुद्दीन यांच्या कुटुंबाला रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. यामुळं मुलाला दोनवेळा वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागले. वाचा-लशीशिवाय 'या' देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त अशी झाली मृतदेहाची अदला-बदली मधु विहार येथे राहणारे कमालुद्दीन यांचे वडील 65 वर्षीय मइनुद्दीन यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यामुळे 2 जूनला लोकनायक रुग्णालयात दाखल केले. 6 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. कमालुद्दीन आपल्या वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी जेव्हा मोर्चारी येथे गेले तेव्हा त्यांनी हा मृतदेह नसल्याचं कळलं, मात्र तरी त्यांनी चौकशी न करता मृतदेह दफन केला. मात्र मोइनुद्दीन यांचे कुटुंबीय वडिलांना पाहता न आल्यानं नाराज आहे. तर, निष्काळजीपणामुळे मोइनुद्दीनचे कुटुंबिय संतप्त आहेत. यासंदर्भात पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. वाचा-एका फोटोग्राफरमुळं अख्खं शहर हादरलं, तब्बल 150 जणं निघाले कोरोना पॉझिटिव्ह
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या