चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

चिदंबरम यांच्या पोटात दुखत असून त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 28 ऑक्टोंबर :  भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अटकेत असलेले माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram ) यांची प्रकृती बिघडली आहे. चिदंबरम यांच्या पोटात दुखत असून त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना दिल्लीतल्या  AIIMS (All India Institute of Medical Sciences) मध्ये दाखल करण्यात आलंय. चिदंबरम सध्या ते EDच्या (Enforcement Directorates)  कस्टडीमध्ये आहे.  त्यांची EDची कस्टडी उद्या संपणार आहे. INX mediaतल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोप असून CBIने त्यांना अटक केली होती.

शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात? सत्तेसाठी भाजपचा 'प्लान-B'तयार

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 22 ऑक्टोबरला त्यांना जामीन मंजूर केला होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत असताना कोर्टाने त्यांना देश न सोडण्याची अट घातली होती. तसचे अन्य कोणत्याही प्रकरणात चिदंबरम यांची गरज नसले तर त्यांची सुटका केली जाऊ शकते. INX मीडियातील घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी चिदंबरम यांची जामीन याचिका रद्द केली होती. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात आहेत.

पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे होणार मंत्री?

सीबीआयने INX मीडिया प्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात चिदंबरम यांनी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. स्पेशल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत चिदंबरम यांनी 2008मध्ये ही लाच घेतल्याचे म्हटले होते. सीबीआयने केलेल्या दाव्यानुसार चिदंबरम यांनी लाच म्हणून 9.96 लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांच्यासह त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम आणि कंपनीच्या अन्य 15 लोकांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून सिंगापूर आणि मॉरिशिस सरकारला पाठवलेला आग्रह पत्राच्या उत्तराच्या आम्ही प्रतिक्षेत आहोत असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

राजकारणातली मोठी बातमी : या कारणांमुळे होतोय सत्ता स्थापनेस उशीर!

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 06:50 PM IST

ताज्या बातम्या