जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / '6 फुटांचं अंतर आणि मास्क जरुरी' आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाचा मेसेज

'6 फुटांचं अंतर आणि मास्क जरुरी' आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाचा मेसेज

'6 फुटांचं अंतर आणि मास्क जरुरी' आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाचा मेसेज

अनोख्या लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सीवान, 26 जून : आतापर्यंत फोनवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कॉलरट्यूनद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आणखी एक भर पडली आहे ती लग्नपत्रिकेची. सिवानमध्ये आता कोरोनाविषयी लोकांमध्ये लग्नाच्या कार्डांद्वारे जनजागृती केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचं या पत्रिकेमध्ये नमूद केलं आहे. कोरोनासारख्या गंभीर साथीचे आजार टाळता येतील आणि लोकांना याची जाणीव होऊ शकेल. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देत आहे. भारतातही कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाविरुद्ध जनजागृती केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा- कोरोना काळात नोकरी गेली, तरी झाला नाही हताश, इंजिनीअरनं सुरू केलं इडली सेंटर कोरोनाचा धोका आणि लॉकडाऊन यामुळे अनेक विवाहांच्या तारख्या रद्द कराव्या लागल्या. काहींनी विवाह पुढे ढकलले तर काहींनी परवानगी काढून घरगुती पद्धतीनं विवाह केले. मात्र विवाह म्हटला की होणारी धामधून आणि लगीनसराईचा आनंद आणि मजेवर मात्र कोरोनानं विरजण घातलं. सीवान जिल्ह्यात लग्नाच्या कार्डावर छापलेला जागरुकता संदेश चर्चेचा विषय बनला आहे. सीवान जिल्ह्यातील मझौली रोड मैरवा निवासी विजय प्रसाद यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणारा संदेश छापण्यात आला आहे. दोन यार्ड अंतर आणि मास्क घालणं संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण लग्नाला उपस्थित राहून आशीर्वाद द्यायला हवा पण त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्क घालायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा- कोरोनावरील ‘त्या’ औषधावर बंदी आणा, अमोल कोल्हेंची केंद्राकडे मागणी बिहारमधील सीवान जिल्ह्यात छापलेल्या या अनोख्या लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे. कोरोनाचा संसर्ग टाऴायाचा असेल तर काही नियमांचं कठोरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचं वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात