गौतम गंभीरकडून पराभूत झालेल्या AAPच्या महिला नेत्याने विधानसभेत मारली बाजी!

गौतम गंभीरकडून पराभूत झालेल्या AAPच्या महिला नेत्याने विधानसभेत मारली बाजी!

सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या आतिशी यांनी अखेरच्या टप्प्यात आघाडी घेत विजय मिळवला.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी :  दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय होणार, असं दिसत आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या कलांनुसार दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (AAP) 62 आणि भाजप (BJP) 8 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठं बहुमत मिळताना दिसत असलं तरीही काही जागांवर मात्र काट्याची टक्कर पाहायला मिळाली. कालकाजी मतदारसंघातून लढत असलेल्या आपच्या उमेदवार आतिशी यांना भाजप उमेदवाराने कडवी लढत दिली. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या आतिशी यांनी अखेरच्या टप्प्यात आघाडी घेत विजय मिळवला.

दरम्यान, आतिषी यांचा 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पूर्व दिल्ली मतदारसंघातून पराभव केला होता.  विजयानंतर गंभीरने ट्विटरवर फटकेबाजी केली होती. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधताना त्याने म्हटलं होतं की ही लवली कव्हर ड्राईव्ह नव्हता ना आतिशी फलंदाजी.

अरविंद केजरीवाल यांच्यावर महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोठा विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनीही केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.

First published: February 11, 2020, 3:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या