दिल्ली विधनसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. यामध्ये आता हाती आलेल्या कलानुसार आपची आघाडी असल्याचं समजत आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर चिमुकल्यानं त्यांच्यासारखी स्टाईल करून प्रचार करताना समोर आली आहे. या चिमुकल्याचा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा लूक या चिमुरडीनं हुबेहुब साकारला आहे.
या मुलाला छोटा केजरीवाल असं नेटकरी आणि समर्थकांनी नाव दिलं आहे. त्याचा हा लूक सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
अव्यान असं या चिमुकल्याचं नाव आहे. आई-वडिलांसोबत ही चिमुकला सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचला होता.
मतमोजणीआधी या चिमुकल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर हजेरी लावली आणि All the best असा गुलाबाच्या पाकळ्यांनी संदेश लिहिला.
दिल्लीमध्ये पुन्हा आपच आघाडीवर आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदाची हॅट्रीक पूर्ण होणार असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. तर दिल्लीत भाजपला मोठा फटका बसला आहे.