जयपूर, 22 जानेवारी : फूटपाथवर विकल्या जाणाऱ्या चहाच्या दुकानात आपल्याला नेहमीच गर्दी दिसून येते. आपणही गरम गरम चहा फुरके घेत आवडीने पित असतो. मात्र यापुढे सावधान, कारण अशा टी-कॉफी स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या चहा-कॉफीमध्ये स्नैक, गांजा आणि डोडा मिसळते जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे चहा-कॉफीमध्ये स्मैक, गांजा, डोडा यांसारख्या मादक पदार्थांचा वापर केला जातो. टी स्टॉलवाले ग्राहक वाढविणाऱ्यासाठी ही धोकादायक पद्धत वापरत आहे.
ऑपरेशन क्लिन स्वीप दरम्यान खुलासा
जयपुर पोलिसांकडून मादक पदार्थांविरोधात तपास सुरू होता. या क्लीन स्वीप ऑपरेशन दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता मादक पदार्थांची तस्करी आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा चहा-कॉफीच्या दुकानांमधून सॅम्पल घेऊन पोलील त्याची तपासणी करीत आहे.
दोन महिन्यात 190 तक्रारी दाखल
हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. आदर्श नगरचे एसीपी पुष्पेंद्र सिंह यांनी सांगितल्यानुसार ऑपरेशन क्लीन स्वीप अंतर्गत पोलिसांनी दोन महिन्यात 190 हून अधिक तक्रारी दाखल करून घेतल्या असून 225 हून अधिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात मादक पदार्थांची निर्यात व आयात करणाऱ्यांकडे पोलीस लक्ष ठेवून होता. यातील चहा-कॉफीचे स्टॉल असणाऱे अनेक मादक पदार्थांची निर्यात करणाऱ्यांच्या संपर्कात होते. यामध्ये अनेक रेस्टॉरंटचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार चहा-कॉफीचे स्टॉल, रेस्टॉरंटचे ग्राहक नकळत मादक द्रव्यांच्या आहारी जात होते. ही बाब अत्यंत धक्कादायक असून अशा प्रकारे गांजाचा वापर ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकतो.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.