BIG NEWS: दिल्लीत संसद भवनाजवळ काश्मीरचा संशयित तरुण ताब्यात, कागदावर मिळाले ‘कोडवर्ड’

BIG NEWS: दिल्लीत संसद भवनाजवळ काश्मीरचा संशयित तरुण ताब्यात, कागदावर मिळाले ‘कोडवर्ड’

त्याच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यावर काही कोडवर्ड लिहिल्याचंही आढळून आलं आहे. त्याचं डिकोडिंग करण्याचं कामही करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 ऑगस्ट: राजधानी दिल्लीत संसद भवनाजवळ एका संशयीत तरुणाला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे. तो काश्मीरचा रहिवासी असून त्याच्या जवळ कोडवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. विजय चौकात संशयास्पद स्थितीत फिरतांना त्याला CRPFने ताब्यात घेतलं आहे. चौकशीत तो वेग वेगळी माहिती देत असल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. संसदभवन परिसर हा हाय सेक्युरेटी झोन असल्याने असा युवक सापडल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.

CRPFच्या जवानांनी या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर संसद भवन मार्ग पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान त्याने वेगवेगळी माहिती दिली आहे. त्याच्या जवळ आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सापडलं आहे. मात्र त्या दोन्हीवर त्याची नावं ही वेगवेगळी आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सवर त्याचं नाव फिरदौस असं असून आधार कार्डावर त्याचं नाव मंजूर अहमद अहंगेर असं आहे. तो दिल्लीत कुठे राहतो आणि कधी आला याबद्दलही त्याच्या माहितीत तफावत आढळून आली आहे.

त्याच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यावर काही कोडवर्ड लिहिल्याचंही आढळून आलं आहे. ते नेमकं काय आहे याचं डिकोडिंग करण्याचं कामही करण्यात येत आहे.

क्या बात है! मृत्यूदर घटला तर रिकव्हरी रेट वाढला, वाचा लेटेस्ट आकडेवारी

काश्मीर मधल्या बडगाम इथला तो रहिवासी असल्याची  माहिती पुढे आली आहे. आयबीसह गुप्तचर संस्था आणि पोलीस त्याची चौकशी करत आहे.

सर्वोच्च सुरक्षा असतांनादेखील हा युवक संसद भवनाजवळ आढळल्याने सर्व तपास यंत्रणांनी आढावा घेतला आहे. संसदेवरच्या हल्ल्यानंतर संसद भवना भोवती अनेक स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ती भेदून जाणं अशक्य समजलं जातं.

EXCLUSIVE : छोटा शकीलनं दाऊद इब्राहिम आणि D कंपनीबाबत केला मोठा खुलासा!

या सुरक्षा व्यवस्थेचा वारंवार आढावा घेण्याचं कामही करण्यात येत असतं. आता सर्व गुप्तचर संस्थाही या चौकशीत सहभागी झाल्याने लकरच त्या को़डवर्डचं डिकडींग केलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading