नवी दिल्ली, 15 मे : कोरोना महासाथीदरम्यान अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. मात्र यामध्ये राक्षसी वृत्तीचे लोकही पाहायला मिळाले. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका प्रसिद्ध सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद मागणी केली. या सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीला वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता होती. मात्र या नराधमाने ऑक्सिजन सिलेंडरच्या बदल्यात तिच्याकडे शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली.
ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. भावरीन कंधारी नावाच्या एका ट्विटर यूजरने याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, माझ्या एका मित्राच्या बहिणीला वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता होती. मात्र तिच्या शेजारच्याने सिलिंडरच्या बदल्यात तिच्यासोबत शारिरीक संबंधांची मागणी केली. यावर काय कारवाई केली जाऊ शकते. मात्र यानंतर तो आपल्या कृत्याबाबत खोटं बोलू शकतो. भावरीन कंधारीचा हा ट्वीट व्हायरल झाला आहे. ज्यानंतर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी सांगितलं की, त्या व्यक्तीचं नाव सार्वजनिक केलं जावं, यानंतर त्याला त्याच्या कृत्याची लाज वाटेल. तर दुसऱ्या एका युजरने सांगितलं की, त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात यावी.
हे ही वाचा-कोरोनावर मात केली तरी तुमचं आरोग्य धोक्यात; या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
My friend’s sister like my baby sister was asked by a neighbour in an elite colony to sleep with him for an oxygen cylinder that she desperately needed for her father;
What action can be taken because the b* will obviously deny, no?#HumanityIsDead — Bhavreen Kandhari (@BhavreenMK) May 11, 2021
Leave aside Legal/Criminal action, let's shame him socially and publically. Name him, let's make that B* (in)famous.
— Vishesh (@Dr_VisheshSingh) May 11, 2021
दुसऱ्या एका मुलीने ट्वीट करीत आपला अनुभवही सांगितला. तिने सांगितलं की, जेव्हा कोरोना महासाथीदरम्यान माहिती घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल केला तर तेथून आलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. त्यांनी सांगितलं, अरे मॅडम, मी फक्त मुली सप्लाय करतो अन्य गोष्टी नाही. आणि कॉल डिस्कनेक्ट केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.