नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : जगभरात जेवणातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हॉटेलमधील जेवणात पाल, झुरळ किंवा किडे आढळल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. असाच एक प्रकार बंगळुरूमधील एका रेस्टोरंटमध्ये समोर आला आहे. बंगळुरूमधील रेस्टोरंटमध्ये गुलाबजामच्या एका भांड्यात मेलेलं झुरळ आढळलं. त्यानंतर आता रेस्टोरंटला 55 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. तक्रारीनंतर पीडित ग्राहकाला ही रक्कम देण्याचे आदेश रेस्टोरंटला देण्यात आले आहेत. काय आहे प्रकरण - हे प्रकरण 2016 मधील आहे. गांधीनगर भागातील एका कामथ हॉटेलमध्ये एका ग्राहकाने गुलाबजाम ऑर्डर केले होते. त्या गुलाबजामच्या भांड्यात ग्राहकाला मेलेलं झुरळ आढळलं. वकील असलेल्या राजन्ना ग्राहकाने ज्यावेळी गुलाबजामच्या भांड्यात मेलेलं झुरळ पाहिलं, त्यावेळी त्यांनी त्याचा फोटो काढण्याचं ठरवलं. परंतु रेस्टोरंट स्टाफने त्यांचा फोन खेचण्याचा प्रयत्न केला. 2 वर्षांपर्यंत रेस्टोरंटने दिलं नाही उत्तर - या घटनेनंतर राजन्ना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण डिस्ट्रिक्ट कंज्यूनर फोरममध्ये गेलं. रेस्टोरंट मालकाने 2 वर्षांपर्यंत नोटिशीला उत्तर दिलं नाही. त्यानंतर न्यायाधिशांनी सेवेतील कमतरतेच्या आधारे पीडित राजन्ना यांना हॉटेलला 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
VIDEO - पाऊटसाठी तरुणीने ओठांची वाट लावली; आता दाखवण्यालायकही राहिले नाही लिप्स
रेस्टोरंटने केला असा दावा - या आदेशाविरोधात कामथ हॉटेलने कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे अपील केलं. त्यांच्याविरोधात खटल्याची माहिती नसल्याचं म्हणत, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या नोटिशीनंतर याबाबत माहिती मिळाल्याचा दावा हॉटेलने केला. त्याशिवाय रेस्टोरंटमधील कोणत्याही स्टाफने राजन्ना यांचा फोन खेचण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हटलं. रेस्टोरंटचा हा दावा कोर्टाकडून फेटाळण्यात आला आणि ड्रिस्ट्रिक्ट कंज्यूमर फोरमचा आदेश 24 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवला आहे.