लंडन, 06 ऑक्टोबर : आता फोटो म्हटलं की पाऊट (Pout) आलंच. तरुणींमध्ये पाऊटची क्रेझ वाढताना दिसते आहे. नैसर्गिकरित्या मिळालेल्या ओठांच्या (Lips) आकाराने परफेक्ट पाऊट (Perfect pout) करता येत नसेल तर मग ते तरुणी कृत्रिमरित्या ओठांचा आकार वाढवून घेतात (Lips surgery). अशाच परफेक्ट पाऊटच्या नादात एका तरुणीने आपल्या ओठांची अक्षरशः वाट लावली आहे. मोठ्या ओठांची हौस एका टिकटॉक स्टारला (TikTok Star) भारी पडली आहे. ओठांना आकर्षक बनवण्यासाठी या तरुणीने लिप फिलरची (Lip Filler) मदत घेतली. लिप फिलिंगनंतर (Lip Filling) तिच्या ओठाची अवस्था झाली. ती त्यावर उपचार करायला गेली तर आणखी भयंकर अवस्था झाली. तरुणीने आपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. @KokoBeaute या टिकटॉक अकाऊंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा -
Shocking! हाणामारीत भयंकर फुटलं डोकं; तरुणाची निम्मी कवटी गायब
व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीचा तिचे ओठ गुलाबी आणि नाजूक आहेत. पण आपल्याला फोटो, व्हिडीओत परफेक्ट पफी पाऊट हवं, यासाठी तिने लिफ फिलर करून घेतलं. तिच्या ओठांवर इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर तिचे ओठ थोडे फुगले. पण यानंतर मात्र ओठांची अवस्था बेकार झाली. तिच्या ओठांमध्ये गाठ झाली.
द सन
च्या रिपोर्टनुसार शेवटी महिलेने आपली लिप फिलिंग काढण्याचं ठरवलं. यामुळे तिच्या ओठांवरील गाठ तर गेली पण तिच्या गुलाबी ओठांचा रंग बदलला. तिचे ओठ निळे झाले. महिलेने लिफ फिलिंग करायच्या आधी आणि नंतर असे ओठांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. अरे देवा हे भयानक आहे, अशी प्रतिक्रिया तिने आपले ओठ पाहताच दिली. हे वाचा -
टाईट जिन्स घालून बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणं पडलं महागात; तरुणीची झाली भयंकर अवस्था
ही संपूर्ण वेदनादायी प्रक्रिया आहे. लिप फिलिंग योग्यप्रकारे नाही झाली तर ती डिझॉल्व्ह करावी लागते. लिप फिलिंग करण्यापूर्वी योग्य माहिती घेऊन योग्य व्यक्तीकडूनच ती करून घ्या, असा सल्लाही तिने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.