मराठी बातम्या /बातम्या /देश /

मॉर्निंग वॉकला नेत आईचा केला विश्वासघात; मुलीनं BF च्या मदतीनं लांबवले 1 कोटी

मॉर्निंग वॉकला नेत आईचा केला विश्वासघात; मुलीनं BF च्या मदतीनं लांबवले 1 कोटी

Theft News: वीस दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या घरातून 43 लाखांसह 99 तोळं सोनं चोरीला गेलं होतं. या जबरी चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

Theft News: वीस दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या घरातून 43 लाखांसह 99 तोळं सोनं चोरीला गेलं होतं. या जबरी चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

Theft News: वीस दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या घरातून 43 लाखांसह 99 तोळं सोनं चोरीला गेलं होतं. या जबरी चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

    नागौर, 07 ऑक्टोबर: वीस दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या घरातून 43 लाखांसह 99 तोळं सोनं चोरीला (43 lakh cash and 1 KG gold theft) गेलं होतं. चोरी नेमकी कोणी केली याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. पण जवळच्याच व्यक्तीनं ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी शिक्षिकेच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक (accused daughter and her Boyfriend arrest) केली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराकडून 37 लाख रुपये रोकड आणि 99 तोळं सोनं जप्त केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित घटना राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या गोटन येथील आहे. येथील फिर्यादी शिक्षिका कांता कुमारी यांच्या पतीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर त्यांच्या सेवेसाठी काही रक्कम मिळाली होती. वीस दिवसांपूर्वी कांता कुमारी यांनी ही रक्कम बँकेतून काढून आपल्या घरात ठेवली होती. या पैशांवर आरोपी मुलगी हिमानीचा डोळा होता. त्यामुळे तिने आपला प्रियकर सुनिलसोबत संगनमत करत आपल्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन बनवला. हेही वाचा-सासूच्या हत्येसाठी विषारी सापाचा वापर; सुनेचा प्रताप पाहून कोर्टही हैराण या प्लॅननुसार, आरोपी तरुणी सकाळी आपल्या आईला जाणूनबुजून मॉर्निंग वॉकला घेऊन गेली. दरम्यानच्या 45 मिनिटांत आरोपी प्रियकर सुनिलने फिर्यादीच्या घरात चोरी केली. आरोपी 43 लाख रुपयांच्या रोकडसह घरातील 99 तोळं सोनं घेऊन फरार झाला. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. पण पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. पण चोरी कोणीतरी जवळच्याच व्यक्तीनं केली असावी, असा संशय पोलिसांना होता, याच दिशेनं पोलिसांनी तपास सुरू ठेवला. हेही वाचा-मुलीचा होणारा छळ सहन न झाल्यानं पित्याची आत्महत्या, व्हिडिओतून मांडली कैफियत याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीचे कॉल डिटेल चेक केले असता, तिचं कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला असता, तो फरार असल्याचं लक्षात आलं. यामुळे पोलिसांना आणखी संशय बळावला. तब्बल वीस दिवस शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी प्रियकर सुनिलकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतप पोलिसांनी आरोपी मुलीला देखील अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rajstan, Theft

    पुढील बातम्या