• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • मुलीचा सासरी होणारा छळ सहन न झाल्यानं पित्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वी व्हिडिओतून मांडली कैफियत

मुलीचा सासरी होणारा छळ सहन न झाल्यानं पित्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वी व्हिडिओतून मांडली कैफियत

Photo Credit : The News Minute

Photo Credit : The News Minute

आपल्या मुलीचा सासरी होणारा छळ सहन न झाल्यानं एका हतबल पित्यानं स्वत:चं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे.

  • Share this:
 नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी विवाहित महिला आणि मुलींचा हुंड्यासाठी (Dowry) छळ होतो. त्यांना शारीरीक व मानसिक त्रास दिला जातो. या गोष्टींचा पीडितांना त्रास तर होतोच शिवाय त्यांच्या माहेरच्या लोकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्या मुलीचा सासरी होणारा छळ सहन न झाल्यानं एका हतबल पित्यानं स्वत:चं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. मुसाकुट्टी असं या दुर्दैवी पित्याचं नाव असून ते केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मम्पाड येथील रहिवासी होते. त्यांनी २३ सप्टेंबर 2021 रोजी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी कुटुंबीयांच्या हाती हा व्हिडिओ लागला. त्यामुळं मुसाकुट्टी यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी मुसाकुट्टी यांचा जावई हमीद याला ५ ऑक्टोबर 2021 रोजी अटक केली आहे. ‘द मिनिट न्यूज’नं याबाबत वृत्त प्रकाशित केलं आहे. सासूच्या हत्येसाठी विषारी सापाचा वापर; सुनेचा प्रताप पाहून कोर्टही हैराण ४६ वर्षीय मुसाकुट्टी झाडांपासून रबर गोळा (rubber tapping) करण्याचं काम करत होते. त्यांची २० वर्षीय मुलगी हिबा आपल्या नवजात मुलासह गेल्या काही महिन्यांपासून वडिलांच्या घरीच राहत होती. कारण हिबाचा पती हमीद तिला सासरी ठेवून घेण्यास तयार नव्हता. आपल्या मुलीचा सासरी होणार छळ सहन न झाल्यानं मुसाकुट्टी यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. त्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मुलीचा सासरी कसा छळ होतो असं सांगितलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 'हिबाला सासरी प्रचंड त्रास दिला जातो. हमीदनं मलादेखील अतिशय वाईट वागणूक दिली. तो सोनं आणि पैशांची मागणी करत होता. मी अतिशय सामान्य माणूस आहे. तरी देखील मुलीसाठी मी त्याला लग्नात १८ तोळे सोनं दिलं होतं आणि लग्नानंतर देखील ६ तोळे सोनं दिलं. मात्र, तरी देखील तो माझ्या मुलीला सासरी नांदवून घ्यायला तयार नाही. माझ्या मुलीनं 2 वर्षांच्या काळात आयुष्यभर लक्षात राहतील अशा वेदना सहन केल्या आहेत', अशी कैफियत मुसाकुट्टी यांनी व्हिडिओमध्ये मांडली आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करताना अनेक वेळा मुसाकुट्टी रडताना देखील दिसत आहेत असंही पोलिसांनी सांगितलं. 'उद्यापर्यंत अहवाल सादर करा', SC चे यूपी सरकारला निर्देश वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर हिबानंदेखील प्रसारमाध्यमांच्या समोर आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, ‘सासरी माझा खूप छळ झाला. माझा नवरा हमीद, सोनं आणि पैशांसाठी छळ करत होता. त्यानं अनेक वेळा मला मारहाण केली. कित्येक रात्री झोपू दिलं नाही. काहीवेळा तर त्यानं सुईने टोचून मला वेदना दिल्या. एका कर्तव्यदक्ष पित्याप्रमाणं माझे वडील मुसाकुट्टी यांनी अतिशय थाटात माझं लग्न लावून दिलं होतं. त्यांना त्रास होऊ नये, म्हणून सुरुवातीला मी मला सासरी होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना सांगितलं नव्हतं.’ 'आत्महत्या प्रतिबंधक संस्थां'चे हेल्पलाइन क्रमांक खाली देण्यात आले आहेत. तुमच्या माहितीत कुणी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या किंवा आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्ती असतील तर या क्रमांकावर संपर्क साधा. केरळ मैत्री: 0484 2540530 चैत्राम: 0484 2361161(दोन्ही सेवा २४ तास सुरू आहेत) तमिळनाडू - राज्य आरोग्य विभाग आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 104 स्नेहा आत्महत्या प्रतिबंधक केंद्र - 044-24640050 (ही तामिळनाडूतील एकमेव खासगी आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन असल्याची नोंद आहे) आंध्र प्रदेश लाइफ सुसाईड प्रिव्हेंशन: 78930 78930 रोशनी: 9166202000, 9127848584 कर्नाटक सहाय (24-तास): 080 65000111, 080 65000222 तेलंगणा राज्य आरोग्य विभाग आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन(टोलफ्री): 104 रोशनी: 040 66202000, 6620200 सेवा: 09441778290, 040 27504682 (सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत) 'आसरा' नावाची संस्था, मानसिक आरोग्याच्या समस्या, आत्मघाती विचार करणाऱ्या व्यक्ती आणि एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आत्महत्येनंतर आघात झालेल्यांना आधार देण्याचं काम करते. 9820466726 हा त्यांचा 24 तास सुरू असणारा संपर्क क्रमांक आहे.
First published: