मराठी बातम्या /बातम्या /देश /

काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली वेगानं, भारतातून दररोज दोन विमानाचं उड्डाण

काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली वेगानं, भारतातून दररोज दोन विमानाचं उड्डाण

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 22 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban)अफगाणिस्ताना (Afghanistan)वर कब्जा मिळवल्यानंतर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात भारत देशाकडूनही प्रयत्न सुरु आहेत. भारत सातत्यानं हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने (Indian Government) आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसी (Evacuate) साठी दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली आहे.

अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा? जाणून घ्या सत्य

15 ऑगस्टला तालिबानद्वारे अफगाणिस्तानच्या (Afghanistan Crisis) काबूलमध्ये (Kabul) कब्जा केल्यानंतर हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकन आणि उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नाटोद्वारे केले जात आहे. अशातच भारताला या संघटनेच्या वतीने काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या काबूल विमानतळ (kabul Airport) पूर्णपणे अमेरिकी सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली आहे. नाटो सैन्याकडून सध्या 25 उड्डाणे काबूल येथून चालवली जात आहेत.

तालिबाननं अपहरण केलेल्या 150 जणांची केली सुटका, सुखरुप भारतीय पोहोचताहेत काबूल विमानतळावर

अजित डोवाल बोलले अमेरिकन समकक्षांशी

अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काबुल विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकन समकक्ष जेक सुलिवान यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भारताच्या पहिल्या विमानाला काबूल येथून उड्डाण घेण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय हवाई दलाने आधीच अफगाणिस्तानमधील 180 लोकांना परत मायदेशी आणलं. यामध्ये भारतीय नागरिक, पत्रकार, मुत्सद्दी, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता.

First published:

Tags: Afghanistan, Airport, Kabul, Taliban