जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'उद्धव ठाकरे, शरद पवार न्याय देतील म्हणून दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या'

'उद्धव ठाकरे, शरद पवार न्याय देतील म्हणून दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या'

'उद्धव ठाकरे, शरद पवार न्याय देतील म्हणून दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या'

मुंबईत खासदाराच्या आत्महत्येनंतर सत्ताधारी पक्षाकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 मार्च : दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणात आता मोहन डेलकरांच्या कुटुंबानं मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. राज्य सरकार आम्हाला न्याय देईल, अशी भावना डेलकर कुटुंबीयाने व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. (Dadra Nagar Haveli MP commits suicide in Mumbai as Uddhav Thackeray Sharad Pawar will give justice) ते म्हणाले की, मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांनी सुसाईट नोटमध्ये त्याचा कारण ही लिहिलं आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफ्फुल खेडा पटेल यांनी त्रास दिल्याचा उल्लेख ही नोटमध्ये करण्यात आला आहे. संसदेतही याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यांचा छळ होत असल्याने डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. दादरा आणि नगर हवेलीत आत्महत्या केली असती तर न्याय मिळाला नसता, असं म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार मला न्याय देतील म्हणून त्यांनी आत्महत्या मुंबईत करत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत आहे. शिवाय डेलकर यांच्या पत्नी कामलाबेन डेलकर, त्यांचा मुलगा अभिनव डेलकर आणि मुलगी या तिघांनी आमची भेट घेतली. आमच्या जीवाला धोका असल्याची मागणी त्यांनी आज केली आहे. या संपूर्ण घटनेत STI चौकाशी राज्य सरकार करणार आहे. हे ही वाचा- सचिन वाझेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गृहमंत्र्यांनी बदलला-फडणवीस काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीच्या खासदाराने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी खासदाराने लिहिलेली सुसाइट नोटही सापडली होती. त्यामध्ये अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावरुन शिवसेना भाजपवर टीका करीत आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करीत भाजपला सवाल केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात