मराठी बातम्या /बातम्या /देश /Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर

Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर

Dadra-Nagar Haveli bypolls result:दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार आघाडीवर .

Dadra-Nagar Haveli bypolls result:दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार आघाडीवर .

Dadra-Nagar Haveli bypolls result:दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार आघाडीवर .

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : देशभरातील 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील रिक्त असलेल्या विधानसभा, लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. दादरा नगर हवेली लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Dadra Nagar Haveli Lok Sabha bypolls) सुरू झाली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Shiv Sena Kalaben Delkar) यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

मतमोजणीच्या 11व्या फेरीनंतर शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 12932 मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना आतापर्यंत 42002 मते मिळाली आहेत तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना आतापर्यंत 29070 मते मिळाली आहेत.

लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी (Deglur Assembly election bypolls counting) होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.

नवव्या फेरीअखेरीस

महावी - जितेश अंतापूरकर - 33068

भाजप- सुभाष साबणे - 22486

वंचित- उत्तम इंगोले - 3022

कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

आठव्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 29375 मते

सुभाष साबणे - 19873 मते

उत्तम इंगोले - 2668 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 25376 मते

सुभाष साबणे - 17164 मते

उत्तम इंगोले - 2257 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर

सहाव्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 22332 मते

सुभाष साबणे - 14564 मते

उत्तम इंगोले - 1840 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर

जितेश अंतापूरकर - 18245 मते

सुभाष साबणे - 12077 मते

उत्तम इंगोले - 1505 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 6168 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरीअखेर

जितेश अंतापूरकर - 14544

सुभाष साबणे - 9975

उत्तम इंगोले - 1225

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी

तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10712 मते, तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 7448 मते

जितेश अंतापूरकर - 10712 मते

सुभाष साबणे - 7448 मते

उत्तम इंगोले - 873 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 3264 मतांनी आघाडी

दुसरी फेरी

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 7295 मते

भाजपचे सुभाष साबणे - 5001 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 769 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 4216 मते

भाजपचे सुभाष साबणे - 2592 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 320 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 1624 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य लढत जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि सुभाष साबणे (Subhash Sabane) यांच्यात होत आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे.

या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Election, Shiv sena