चेन्नई 09 जानेवारी : तामिळनाडूमध्ये कस्टम डिपार्टमेंटने सोन्याच्या तस्करीप्रकरणी कारवाई करत लाखोंचं सोनं जप्त केलं आहे. तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट पावडरमध्ये मिसळलेलं 211 ग्रॅम सोनं जप्त केलं. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 21.55 लाख रुपये आहे. बहिणीच्या मैत्रिणीसह CA विद्यार्थ्याचं कांड, व्यापाऱ्याला 26 लाखांना लुटलं, पत्रात होतं सिक्रेट मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून आलेल्या एका प्रवाशावर तपासादरम्यान संशय आला. यामुळे त्याला थांबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रवासी शनिवारी एअर इंडियाच्या फ्लाइट IX612 ने विमानतळावर पोहोचला आणि तपासणीदरम्यान पकडला गेला. प्रवाशाने चॉकलेट पावडरमध्ये सोन्याची पावडर मिसळून ती चतुराईने चॉकलेट पावडरच्या तीन कंटेनरमध्ये लपवून ठेवल्याचं तपासात निष्पन्न झालं. कस्टम विभागाने ते जप्त केलं आहे. कस्टम विभागाने चॉकलेट पावडरची तपासणी केली असता ते चक्रावून गेले. त्यात अतिशय हुशारीने सोनं लपवलं गेलं होतं. याशिवाय सोनसाखळीही जप्त करण्यात आली आहे. हा प्रवासी दुबईहून आल्याचं सांगण्यात येत आहे. ‘बोट लावीन तिथे पैसेच पैसे’, एटीएममधून तब्बल 7 लाख रुपये केले गायब, पोलीसही झाले हैराण कस्टम विभागाने 24 कॅरेट शुद्धतेचं 211 ग्रॅम सोनं जप्त केल्याचं सांगण्यात आलं. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवाशाच्या चेक इन बॅगेजमध्ये 175 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही सापडली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची एकूण किंमत 21.55 लाख रुपये आहे. या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चॉकलेट पावडरमधून केल्या जाणाऱ्या या सोन्याच्या तस्करीचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.