जयपूर, 7 जानेवारी : बहिणीच्या मैत्रिणीसह सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं एका व्यापाऱ्याला 26 लाख रुपयांना लुटलं आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या या बंटी-बबलीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्यें ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीए फायनल इयरला असलेल्या रोहित बोहरा आणि प्रियंका नावाच्या तरुणीला अटक केली आहे. प्रियंकाच्या मदतीने मास्टर माईंड असलेल्या राहुलने व्यापारी दीपक माहेश्वरी यांना त्यांची वैयक्तिक माहिती व्हायरल करण्याची धमकी दिली. या दोघांनी व्यापाऱ्याकडून दोन हफ्त्यांमध्ये जवळपास 26 लाख 25 हजार रुपये वसूल केले. आरोपींच्या धमकीला घाबरून दीपक माहेश्वरी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बोहराने 26 डिसेंबरला दीपक माहेश्वरी यांना बंद लिफाफ्यात धमकी दिली आणि 23 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम 5 जानेवारीला रात्री 1 वाजता विद्याधर नगर भागात एका शोरूमच्या जवळ झाडाखाली ठेवायला सांगण्यात आली. यानंतर माहेश्वरी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. या ब्लॅकमेलरला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. यानंतर 5 जानेवारीला माहेश्वरी यांना बॅगेमध्ये नोटा ठेवण्याऐवजी कागद ठेवायला पोलिसांनी सांगितलं. यानंतर माहेश्वरी यांनी बॅग ठरलेल्या ठिकाणी ठेवली. ही बॅग घेण्यासाठी राहुल बोहरा त्याच्या कारने पोहोचला. राहुलने बॅग उचलल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तपासादरम्यान राहुलने त्याची सहकारी प्रियंकाचंही नाव घेतलं, त्यामुळे पोलिसांनी प्रियंकालाही अटक केली. व्यापाऱ्याच्या ऑफिसमध्येच प्रियंका कर्मचारी आरोपी प्रियंका आणि राहुल बोहरा याची बहिण माहेश्वरी यांच्या ऑफिसमध्येच काम करतात. प्रियंका आणि राहुलची बहीण चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांचीही ओळख झाली. दीपक माहेश्वरीकडे पैसे असल्याचं राहुलला समजलं आणि मग त्याने प्रियंकाच्या मदतीने व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. रिक्षावाल्याकडून पाठवली धमकी राहुलने प्रियंकाच्या माध्यमातून दीपक माहेश्वरी यांची वैयक्तिक माहिती गोळा केली. यानंतर फिल्मी स्टाईलने 1 नोव्हेंबर 2021 ला बंद लिफाफ्यात धमकीच पत्र माहेश्वरी यांना पाठवण्यात आलं. रात्री 1 वाजता रिक्षावाल्याच्या मदतीने हे पत्र फॅक्ट्रीमध्ये असलेल्या गार्डला देण्यात आलं. या लिफाफ्यात व्यापाऱ्याच्या वैयक्तिक गोष्टी व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. यानंतर पहिल्या वेळी 11 लाख आणि दुसऱ्या वेळी 15 नोव्हेंबर 2021 ला पुन्हा एकदा बंद लिफाफा पाठवून 15 लाख 25 हजार वसूल करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.