Home /News /national /

CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, गोळीबाराचा LIVE VIDEO

CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, गोळीबाराचा LIVE VIDEO

सोमवारी शेकडो आदिवासी नागरिक सिलेगरच्या कॅपजवळ जमा झाले होते. या ठिकाणी कॅप उभारायला आदिवासी नागरिकांचा विरोध आहे

  बिजापूर, 18 मे: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापुर (Bijapur) जिल्ह्यात सीआरपीएफ (CRPF) कॅपवर माओवाद्यांचा गोळीबार प्रतिउत्तरात सीआरपीएफ ने केलेल्यागोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. पण मृतक नागरिक आहेत की माओवादी हे स्पष्ट नाही. तर या गोळीबारात 9 नागरिकांचा मृत्यू झालाअसा दावा आदिवासींनी केला आहे. गोळीबार करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

  सोमवारी शेकडो आदिवासी नागरिक सिलेगरच्या कॅपजवळ जमा झाले होते. या ठिकाणी कॅप उभारायला आदिवासी नागरिकांचा विरोध आहे.

  गेल्या दोन दिवसापासून नागरिक विरोध करीत आहेत. रविवारी प्रशासनाने त्यांची समजुत काढुन परत पाठवले होते. पण ते सोमवारी शेकडोनागरिकांसह दुपारी कॅपच्या जवळ गोळा होऊन नारेबाजी करु लागले. या नागरिकामध्ये लपलेल्या माओवाद्यानी कॅपवर गोळीबार केल्याचापोलीस दावा करतायत दुसरीकडे मृतक कोण आहे हे अद्यापी स्पष्ट नाही.

  दरम्यान. झालेल्या गोळीबारात पंधरा ते वीस नागरिक जखमी झाले आहे. तर 9 नागरिक गोळीबारात ठार झाल्याचा दावा आदिवासी नागरीकांनीकेला आहे. सिलेगर येथील पोलीस कॅप उभारणीला विरोध करत हजारो आदिवासी तिथे जमले होते त्यावेळी कॅपवर गोळीबार झाल्याचे सांगतपोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला होता. या भागात तणावाची परिस्थिती असून जखमी नागरिकांना बिजापुरलाउपचारासाठी हलवण्यात आले आहे.

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Breaking News, Chhattisgarh, India, Military

  पुढील बातम्या