जाहिरात
मराठी बातम्या / देश / गुजरातमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत रांगा; लवकर अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितले जात असल्याचं उघड

गुजरातमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत रांगा; लवकर अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितले जात असल्याचं उघड

गुजरातमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत रांगा; लवकर अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितले जात असल्याचं उघड

सुरत येथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लाईन लागली असल्याचं चित्र आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सुरत, 11 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरतमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. मृतांची संख्या सतत वाढते आहे. परिणामी स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लाईन लागली असल्याचं चित्र आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरतमध्ये आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ होत असताना 12 सदस्यीय केंद्रीय दलाने मागील आठवड्यात सुरतचा दौरा केला होता. शहरातील वराछा येथील अश्निनीकुमार स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी टोकन घ्यावं लागत आहे. टोकन घेतल्यानंतर लोक आपली वेळ येईपर्यंत वाट पाहतात. एवढंच नाही, तर टोकन सिस्टममध्येही काही लोक लाच देऊन लवकर अंत्यसंस्कार करत असल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ता हरिश गुज्जर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी टोकन घेऊन अनेक लोक वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. अंत्यसंस्कारासाठी तासंतास लाईनमध्ये उभं राहायचं नसल्यास, 1500 ते 2000 द्यावे लागतील असं काही लोक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगत असल्याचा आरोपही हरिश यांनी केला आहे. मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार - सुरतमध्ये कोरोनामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. शहरात एकाचवेळी 25 लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतील, यासाठी तयारी सुरू आहे. कोविड आणि नॉन-कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागत आहेत.

(वाचा -  धुळे: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह )

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती अधिक गंभीर - सुरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी सांगितलं की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती गंभीर आहे आणि संक्रमणापासून बचावासाठी घरात राहणं आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. केंद्रीय पथकाने अँटीजेन आणि आरटी-पीसीआर स्क्रिनिंग, संसर्गाचं प्रमाण, लसींची संख्या आणि रुग्ण व्यवस्थापनासंदर्भात माहिती घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात