क्रुरता!,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू

क्रुरता!,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू

जमिनीच्या वादातून या गर्भवती महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेच्या गर्भात असलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

  • Share this:

बिहार, 18 जुलै : मोतिहारी जिल्ह्यात एक महिलेसोबत झालेल्या घटनेमुळे क्रृरतेचा कळस गाठलाय. जमिनीच्या वादातून या गर्भवती महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेच्या गर्भात असलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही महिला सात महिन्यांची गर्भवती होती.

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

ही घटना बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील मधुबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनिहाय गावात घडली. या गावात रेखा कुमार ही महिला राहते. या महिलेच्या शेजाऱ्यांची तिच्या घरावर नजर होती. शेजाऱ्यांनी तिच्यावर अनेक वेळा दबाव टाकून जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला. पण रेखाने याला कडाडून विरोध केला. पीडित महिलेचा पती हा दुसऱ्या राज्यात कामासाठी गेला होता. महिला घरात एकटी असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी तिच्यावर हल्ला केला. या महिलेला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली. पीडित महिला ही सात महिन्याची गर्भवती होती. या मारहाणीत तिच्या गर्भातील अर्भकाचा करूण अंत झाला.

चिमुरड्याला पुलावर सोडून आईची नदीत उडी

या मारहाणीच्या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेतली पण पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिने वारंवार पोलिसांकडे विनंती केली पण पोलिसांनी तिचं ऐकलं नाही. आपल्याला न्याय मिळावा यासाठी पीडित महिलेनं आपल्या मृत अर्भकाचा मृतदेह घेऊन पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला. अखेर पोलिसातल्या वर्दीला जाग आली. पोलिसांनी मृत अर्भकाचं शवविच्छेदन केलं आणि पीडित महिलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर महिलेच्या जबाबावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे पाचही जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

First published: July 18, 2018, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading