चिमुरड्याला पुलावर सोडून आईची नदीत उडी

चिमुरड्याला पुलावर सोडून आईची नदीत उडी

तीन वर्षांच्या मुलाला पुलावर सोडुन महिलेने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी गोदावरी नदीच्या नावघाट पुलावर घडली.

  • Share this:

नांदेड,17 जुलै : तीन वर्षांच्या मुलाला पुलावर सोडुन महिलेने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी गोदावरी नदीच्या नावघाट पुलावर घडली. 30 वर्षीय मीनाक्षी गोटमुखले असं या महिलेचं नाव आहे.  मीनाक्षी गोटमुखले या महिलेने उडी घेतली तेव्हा याच ठिकाणी उपस्तिथ असलेले गोदावरी जीवरक्षक दलाचे सदस्यांनी तातडीने नदीत गेले.

VIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले

पाण्यात बुडत असलेल्या या महिलेला जीव रक्षकानी बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यापूर्वी काही युवकांनी पुलावरील मुलाला बाजूला नेले. या महिलेला जीव रक्षकानी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महिला आणि तिचा 3 वर्षाचा मुलगा दोघेही सुखरूप आहेत. मीनाक्षी गोटमुखले ही महिला दूध डेअरी परीसरातील रहिवाशी आहे. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं तिनं सांगितलं.

VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला मनसेसैनिकाच 'खळ्ळ-खट्याक'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 11:18 PM IST

ताज्या बातम्या