मराठी बातम्या /बातम्या /देश /मुलगा गमावला आणि गुन्हाही शिरावर आला! लायसन्स नसताना मुलाने गाडी चालवली म्हणून आईवर गुन्हा

मुलगा गमावला आणि गुन्हाही शिरावर आला! लायसन्स नसताना मुलाने गाडी चालवली म्हणून आईवर गुन्हा

वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. मुलांच्या हातात लहान वयातच वाहनं देणं तर नेहमीच दिसतं. 19 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या आईवरही गुन्हा दाखल झाला आहे.

वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. मुलांच्या हातात लहान वयातच वाहनं देणं तर नेहमीच दिसतं. 19 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या आईवरही गुन्हा दाखल झाला आहे.

वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. मुलांच्या हातात लहान वयातच वाहनं देणं तर नेहमीच दिसतं. 19 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या आईवरही गुन्हा दाखल झाला आहे.

हैदराबाद, 2 मार्च: वाहनातून किंवा स्वतः वाहन चालवून प्रवास करण्याला आजच्या जगात पर्याय नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचीही कडक अंमलबजावणी व्हायला हवी पण वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. मुलांच्या हातात लहान वयातच वाहनं देणं तर नेहमीच दिसतं. असाच एक प्रकार अत्यंत दुर्दैवी पद्धतीने उघडकीला आला. 19 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. पण त्याला लायसन्स नसताना गाडी चालवायची परवानगी दिली म्हणून आईवरही गुन्हा दाखल झाला आहे.

वाहतुकीचे  नियम कडक असले, तरी बऱ्याचदा त्यांची अंमलबजावणी गांभीर्याने होत नाही. अर्थातच वाहनचालकांची तशी मानसिकता नसते आणि यंत्रणाही या बाबतीत सदैव काटेकोर राहत नाही. नियम प्रत्येकाने पाळणं का आवश्यक असतं, हे बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर कळतं. हैदराबाद (Hyderabad) येथे अलीकडेच झालेला अपघात हे त्याचं एक दुर्दैवी उदाहरण मानता येईल.

जी. योगेश सागर (G. Yogesh Sagar) नावाच्या 19 वर्षांच्या युवकाचा गेल्या महिन्यात अपघाती मृत्यू झाला. 23 फेब्रुवारी रोजी योगेशच्या स्कूटरला काँक्रीट मिक्सर ट्रकची (Concrete Mixer Truck) धडक बसली आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधल्या गच्चीबावली परिसरातल्या मस्जिदबांदा इथे हा अपघात घडला होता. हाताशी आलेला मुलगा अपघातात गमावण्याचं दुःख काय असतं, ते त्यांचे पालकच जाणोत; पण यातलं दुर्दैव हे होतं, की त्या युवकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स (Driving License) अर्थात वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याची आई डी. गीता राणी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. का? तर लायसेन्स नसतानाही त्याला गाडी चालवू दिल्याबद्दल. 'तेलंगण टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

योगेश सागर 19 वर्षांचा म्हणजेच नुकताच वयात आलेला मुलगा होता. त्यामुळे गाडी चालवण्याची उत्सुकता आणि हौस दोन्हीही प्रचंड; मात्र त्याला कायद्याची जाणीव करून देऊन, लायसेन्स काढल्याशिवाय गाडी चालवू न देण्याची जबाबदारी पालक म्हणून त्याच्या आईची होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

(हे पाहाबारमध्ये तुफान राडा, तरुणाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या, LIVE VIDEO   )

ट्रक ड्रायव्हर डी. भुमैया याच्यावरही पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच ट्रकचा मालक कमलाकर रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवजड वाहन असूनही ड्रायव्हर ते अतिवेगाने, बेजबाबदारपणे चालवत होता, तसंच त्या वाहनासाठी निर्बंध असलेल्या वेळेत तो ते चालवत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ड्रायव्हरला गच्चीबावली पोलिसांनी अटकही केली आहे.

अल्पवयीन मुलांना बाइक, स्कूटर, कार चालवण्याचं बरंच आकर्षण असतं. काही कुटुंबांत आई-वडिलांचा धाक असतो, अशा ठिकाणी ते चोरून गाडी शिकतात. काही कुटुंबांत  आई-वडीलच बिनधास्तपणे आपल्या मुलांच्या हातात गाडी देतात. गाडी चालवण्यासाठी 18 वर्षांची वयोमर्यादा कायद्याने का ठरवलेली आहे? ऐन वेळी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये विकसित होईपर्यंत साधारण तितकं वय व्हावं लागतं, म्हणून. अपघात झाला तर त्या मुलाचा आणि समोरच्या व्यक्तीचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे याचं गांभीर्य आपल्या मुलांना पटवून देऊन त्यांना कमी वयात गाडी चालवायला न देणं, याचं बंधन पालकांनी पाळलं पाहिजे. 18 वर्षं पूर्ण झाल्यावर मुलांना रीतसर ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देऊन, नियमांची व्यवस्थित माहिती देऊन, लायसेन्स काढून देऊन मगच त्यांना गाडी चालवायला द्यावी, असं आवाहन या विषयातले तज्ज्ञ कायमच करत असतात. त्याची दखल निदान अशा दुर्दैवी घटनांतून तरी नागरिकांनी घ्यावी.

First published:

Tags: Accident, Hyderabad