जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बारमध्ये तुफान राडा, तरुणाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या, LIVE VIDEO

बारमध्ये तुफान राडा, तरुणाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या, LIVE VIDEO

बारमध्ये तुफान राडा, तरुणाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या, LIVE VIDEO

तेजीने बारमध्ये गोंधळ घालत भुपेंद्र राठोड मारहाण करीत त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या आणि ते सगळे पसार झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

उल्हासनगर, 02 मार्च : क्षुल्लक कारणावरून अट्टल गुन्हेगाराने एका तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून त्याला गंभीर जखमी केले आहे. उल्हासनगर कॅम्प 5 च्या मठ मंदिर भागातील रचना बारच्या बाहेर घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगर शहरात अनेक गुन्हेगारी कारवायांच्या बैठका आणि प्लॅनिंग बारमधून होत असताना पोलीस मात्र त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप अनेकदा शहरवासीयांनी केला आहे. दरम्यान या  हल्ल्यात जखमी झालेल्या भुपेंद्र राठोड याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मुख्य आरोपी ऋतिक तेजी आणि त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

मठ मंदिर भागातील रचना बारमध्ये रात्रीच्या सुमारास भुपेंद्र राठोड आणि त्याचे मित्र बसले होते. यावेळी एका आरोपीने राठोड याच्या मित्रास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी राठोड याने शिवीगाळ का करतो याची विचारणा केली असता. आरोपीने गुन्हेगार असलेल्या ऋतिक तेजी याला बोलावून घेतले. तेजीने बारमध्ये गोंधळ घालत भुपेंद्र राठोड मारहाण करीत त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या आणि ते सगळे पसार झाले. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तेजीवर हिललाईन, मध्यवर्ती, शिवाजीनगर आणि अन्य पोलीस ठाण्यात खून, खुनाचे प्रयत्न, लूटमार,धमकवणे या सारखे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दुकाने रात्री दहा वाजता बंद केली जात आहेत मात्र, रेस्टॉरंट आणि बारला यातून सूट दिली जात असल्याचा आरोप देखील केला जातोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात