जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 3 लाख पास, 1 लाख गुन्हे आणि तब्बल 87 हजार तक्रारींचे फोन; कोरोनाशी असं लढतंय राज्य

3 लाख पास, 1 लाख गुन्हे आणि तब्बल 87 हजार तक्रारींचे फोन; कोरोनाशी असं लढतंय राज्य

3 लाख पास, 1 लाख गुन्हे आणि तब्बल 87 हजार तक्रारींचे फोन; कोरोनाशी असं लढतंय राज्य

कोरोनाला तोंड देण्यासाठी आपलं पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मे : राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. संपूर्ण सेवा कामाला लागली असताना कोरोनाचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशात लॉडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोव्हिड-19 संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3,20,697 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसंच राज्यात 1 लाख 245 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 8 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,00,245 गुन्हे नोंद झाले असून 19,297 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 76 लाख 53 हजार 694 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कडक कारवाईचे आदेश कोरोनाला तोंड देण्यासाठी आपलं पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 194 घटना घडल्या. त्यात 689 व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. 100 नंबरवर - 87 हजार फोन पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या 100 नंबरवर प्रचंड भडिमार झाला. 87,014 फोन या नंबरवर करण्यात आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का आहे अशा 658 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. राज्यात एकूण 253,025 व्यक्ती क्वारंटाईन आहेत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1289 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 54,611 वाहनं जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत. पोलीस कोरोना कक्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3, पुणे 1, सोलापूर शहर 1 अशा 5 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 71 पोलीस अधिकारी व 577 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणं दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. रिलिफ कँम्प राज्यात एकूण 4144 हजार रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 4,04,497 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तसंच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावं, असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात