जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ, मात्र या 2 गोष्टी भारतासाठी जमेच्या

कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ, मात्र या 2 गोष्टी भारतासाठी जमेच्या

कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ, मात्र या 2 गोष्टी भारतासाठी जमेच्या

देशात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण हे 41.61 टक्के आहे. तर मृत्यू दर हा 2.87 टक्के आहे. हे प्रमाण सगळ्यात कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 मे: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या आता लाखाच्या वर गेली आहे. मात्र रिकव्हरी रेट हा जगात सर्वात जास्त आणि मृत्यू दर हा जगात सगळ्यात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केलं. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त टेस्त होत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण हे 41.61 टक्के आहे. तर मृत्यू दर हा 2.87 टक्के आहे. हे प्रमाण सगळ्यात कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. भारतात कोरोनारुग्ण बरं होण्याचं प्रमाण 7.1% मार्च 11.42%  लॉकडाऊन 2 26.59 लॉकडाऊन 3 41.61% सध्याचं प्रमाण मृत्यूदर 3.3% आधी 2.87% सध्या महाराष्ट्रात (maharashtra) मुंबई, पुण्यानंतर नागपुरात कोरोनाव्हायरसने (nagpur coronavirus) पाय रोवले. मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतेच आहे. मात्र नागपूर कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतं आहे. नागपुरात 75 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नागपुरात कोरोनाचे एकूण 406 रुग्ण आहेत. त्यापैकी 313 रुग्ण बरे झालेत. याचा अर्थ नागपुरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 75-80 टक्के आहे. कोरोनाव्हायसरवर मात करण्यात नागपूर यशस्वी  होताना दिसतं आहे. हेही वाचा - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल की नाही? भाजपच्या मोठ्या नेत्याचा खुलासा महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, राहुल गांधींचं वक्तव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात