• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल की नाही? भाजपच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल की नाही? भाजपच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ही नारायण राणे यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:
चंद्रपूर, 26 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे.  राज्यात कोरोनाची परिस्थितीत बिकट झाली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता फेटाळून लावली आहे. सोमवारी नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि पालिकेची रुग्णालय ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली होती. तर आज सुधीर मुनगंटीवार यांनी नारायण राणे यांची भूमिका ही व्यक्तिगत असल्याचं स्पष्ट केलं आहे. हेही वाचा - महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, राहुल गांधींचं वक्तव्य 'नारायण राणे यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. ते मुख्यमंत्री असताना लोकहिताचे निर्णय घेण्यास प्रसिद्ध होते. ते कोणताही निर्णय पटकन घेत होते. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मुंबई शहराची अशी परिस्थिती पाहून त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी व्यक्तिगत आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. तसंच, 'महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अशी कोणतीही परिस्थिती नाही. राज्य घटनेच्या तरतुदीनुसार किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहे, त्यानुसार, राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू करता येते अशी कोणतीही भूमिका भाजपची नाही. माझं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बोलणं झालं आहे त्यांनीही याबद्दल स्पष्ट केलं आहे, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा -महाविकास आघाडी सरकार अस्थिर? थोरातांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका 'राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. त्यामुळे मुंबईला पहिले यातून बाहेर काढावे लागणार आहे. सिंगापूर पॅटर्न असेल किंवा वुहान पॅटर्न असेल याचा अभ्यास केला पाहिजे. एवढंच नाहीतर बारामती शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती पॅटर्न वापरला होता. त्याचाही विचार केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मुंबईतील संख्या ही आटोक्यात आली पाहिजे', असा सल्लाही मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे कोणतीही बैठक नाही - राणे दरम्यान,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी  'मातोश्री'वर गेलेच नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावा  नारायण राणे यांनी केला आहे. तसंच,  'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही.   कोरोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली. 'काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे', असा टोलाही राणेंनी लगावला. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published: